शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जबरा फॅन! मेस्सीला भेटण्यासाठी त्याने सायकलवरून गाठले रशिया   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 09:05 IST

आपला आवडता फिल्मस्टार, खेळाडू यांना भेटण्यासाठी त्यांचे चाहते वाटेल ते करण्यास तयार असतात. सध्या रशियात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने अशाच एका चाहत्याचे ताजे उदाहरण समोर आले आहे.

नवी दिल्ली -  आपला आवडता फिल्मस्टार, खेळाडू यांना भेटण्यासाठी त्यांचे चाहते वाटेल ते करण्यास तयार असतात. सध्या रशियात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने अशाच एका चाहत्याचे ताजे उदाहरण समोर आले आहे. फुटबॉलवेड्या केरळमधील क्लिफिन फ्रान्सिस या तरुणाने फुटबॉल विश्वचषक पाहण्यासाठी आणि अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला भेटण्यासाठी चक्क सायकलवरून रशिया गाठले आहे. मेस्सीचा चाहता असलेल्या क्लिफिनला आपल्या सायकलवर मेस्सीची स्वाक्षरी हवी आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे. साकलवरून रशिया गाठणारा क्लिफिन म्हणतो की, मी लहानपणापासूनच फुटबॉलचा चाहता आहे. बार्सिलोना हा माझा आवडता संघ आहे. तसेच फुटबॉल विश्वचषक पाहणे हे माझे स्वप्न आहे. पण हे स्वप्न पूर्ण करणे माझ्यासाठी बरेच खर्चिक ठरत आहे."क्लिफिन याला फ्रान्स आणि डेन्मार्कमध्ये होणारी साखळी लढत पाहायची आहे. त्यानंतर तो काही दिवस रशियात वास्तव्य करणार आहे. त्यानंतर मेस्सीची स्वाक्षरी असलेली सायकल घेऊन तो भारतात परत येईल. उच्चशिक्षित असलेल्या क्लिफेनने बीटेकची पदवी घेतल्यानंतर कोची येथे सिस्टिम इंजिनियर म्हणून नोकरी केली होती. तसेच आपल्या रशिया दौऱ्यासाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी शिकवण्याही घेतल्या. क्लिफिन याने आपल्या रशिया प्रवासाला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात केली. "सुरुवातीला मी केरळमधून दुबईला गेलो. तिथे मी सायकल विकत घेतली. त्यानंतर थेट रशियाची वाट धरली. यूएई, इराण, अझरबैजान असा प्रवास करत रशिया गाठले. मी अद्यापही मॉस्कोपासून 600 किमी दूर आहे. मी भारतीय असल्याचे ज्यांना ज्यांना समजते ते माझ्याशी चांगले वर्तन करतात, असेही क्लिफन याने सांगितले.  

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८russiaरशियाFootballफुटबॉलIndiaभारत