शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अलविदा दोस्त... रोनाल्डोला रेयाल माद्रिदची भावपूर्ण भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 17:06 IST

ख्रिस्तियानो रोनाल्डोने रेयाल माद्रिदला निरोप देत इटालियन क्लब युव्हेंट्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे चाहते दुखावले. रोनाल्डो माद्रिदकडून जवळपास नऊ वर्षे खेळला आहे.

माद्रिद  - ख्रिस्तियानो रोनाल्डोने रेयाल माद्रिदला निरोप देत इटालियन क्लब युव्हेंट्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे चाहते दुखावले. रोनाल्डो माद्रिदकडून जवळपास नऊ वर्षे खेळला आहे. त्याने क्लबला अनेक ऐतिहासिक जेतेपद जिंकून दिली आहेत. त्यामुळे रोनाल्डोचा हा निर्णय माद्रिद व त्यांच्या पाठिराख्यांना पटणारा नाही. त्यामुळे त्यांच्या भावनांचा बांध फुटलेला पाहायला मिळत आहे.विश्वचषक स्पर्धेनंतर रोनाल्डो युव्हेंट्स क्लबशी करार करणार अशा चर्चा रंगल्या होत्या आणि त्या ख-या ठरल्या. जवळपास 800 कोटी रूपयांच्या करारासह रोनाल्डोने युव्हेंट्सची ऑफर स्वीकारली. 2009 मध्ये मँचेस्टर युनायटेडला सोडून तो माद्रिद क्लबमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर 2018 पर्यंत त्याने या क्लबसोबत अनेक अविस्मरणीय विजय मिळवले. याच विजयांचे क्षण व्हिडीओच्या माध्यमातून रेयाल माद्रिद क्लबने सोशल मीडियावर प्रसिद्ध करून रोनाल्डोला अनोखी भावनिक भेट दिली आहे. रोनाल्डोच्या क्लब सोडल्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी माद्रिद इडन हॅझार्ड, रोमेलु लुकाकु, कायलीन मॅब्प्पे आदी खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.   

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉलSportsक्रीडाFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८