France vs Croatia, WC Final : ग्रिझमनने केलेला डान्स चांगलाच गाजला, पाहा व्हिडीओ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 22:41 IST2018-07-15T22:40:31+5:302018-07-15T22:41:10+5:30
सामन्याच्या 38व्या मिनिटाला फ्रान्सच्या ग्रिझमनने गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर ग्रिझमनने खास डान्स केला.

France vs Croatia, WC Final : ग्रिझमनने केलेला डान्स चांगलाच गाजला, पाहा व्हिडीओ...
मॉस्को : विश्वचषकात गोल करणं सोपं नाही आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत तर कर्मकठिण. पण फ्रान्सच्या खेळाडूंनी अंतिम फेरीत क्रोएशियावर 4-2 असा विजय मिळवत विश्वचषक पटकावला. या सामन्याच्या 38व्या मिनिटाला फ्रान्सच्या ग्रिझमनने गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर ग्रिझमनने खास डान्स केला.
GRIEZMANN HIT EM WITH THE FORTNITE DANCE pic.twitter.com/ZRkojkXwjg
— Marina Molnar (@mkmolnar) July 15, 2018
सामन्याच्या 37व्या मिनिटाला फ्रान्सने जोरदार आक्रमण केले होते. त्यावेळी क्रोएशियाच्या पेरिसिकच्या हाताला चेंडूला लागला. पंचांनी व्हिडीओ पाहिला आणि त्यानंतर फ्रान्सला स्पॉट किक बहाल केली. त्यावेळी ग्रिझमनने स्पॉट किकवर गोल केला. गोल केल्यावर आपल्या खास शैलीमध्ये ग्रिझमनने सेलिब्रेशन केलं.