विश्वविजेत्या फ्रान्स संघातील खेळाडूची कमाल, 13 मिनिटांत 4 गोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 12:29 IST2018-10-09T12:29:11+5:302018-10-09T12:29:30+5:30
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतीत युवा खेळाडूचा पुरस्कार जिंकणाऱ्या फ्रान्सच्या खेळाडूने मंगळवारी अविस्मरणीय कामगिरी केली.

विश्वविजेत्या फ्रान्स संघातील खेळाडूची कमाल, 13 मिनिटांत 4 गोल
पॅरिस : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतीत युवा खेळाडूचा पुरस्कार जिंकणाऱ्या फ्रान्सच्या खेळाडूने मंगळवारी अविस्मरणीय कामगिरी केली. विश्वविजेत्या फ्रान्स संघातील कायलिन मॅबाप्पेने अवघ्या 13 मिनिटांत 4 गोल करताना एक विक्रम नावावर केला. पॅरिस सेंट जर्मेन क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मॅबाप्पेने ( 19 वर्ष व 9 महिने) या कामिगीरसह लीग 1 स्पर्धेत चार गोल करणाऱ्या युवा खेळाडूचा मान पटकावला.

FULL TIME: Led by a four-goal @KMbappe, PSG thrash Lyon and become the first team to win their opening nine games in a @Ligue1_ENG season!! 🔴🔵#PSGOLpic.twitter.com/w06fTtl3iU
— Paris Saint-Germain (@PSG_English) October 7, 2018
आठ मिनिटांत हॅटट्रिक
पहिल्या सत्रात नेयमारने (9 मि.) पेनल्टी स्पॉट किकवर पॅरिस सेंट जर्मेन क्लबला आघाडी मिळवून दिली होती. त्यात मॅबाप्पेने दुसऱ्या सत्रात चार गोल्सची भर घातली. त्याने अवघ्या आठ मिनिटांत ( 61, 66 व 69 मि.) हॅटट्रिक पूर्ण केली. पाच मिनिटानंतर त्यात आणखी एका गोलची भर घातली.
पाहा व्हिडीओ...