शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या चार मुली भारतीय फुटबॉल संघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 11:22 IST

महाराष्ट्राच्या चार मुली सॅफ 15 वर्षांखालील मुलींच्या अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

मुंबई - महाराष्ट्राच्या चार मुली सॅफ 15 वर्षांखालील मुलींच्या अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. भुटान येथे 8 ते 19 ऑगस्ट या कालावधीत पार पडणा-या सॅफ स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. महाराष्ट्राच्या प्रियांका सुजीश, जान्हवी शेट्टी व मेहक लोबो ( सर्व मुंबई) आणि अंजली बारके ( पुणे) यांनी 23 सदस्यीय भारतीय संघात स्थान पटकावले आहे.

संघातील चार आक्रमकपटूंमध्ये महेकचा समावेश आहे. प्रियांकाला डिफेन्सीव मिडफिल्डर, जान्हवीला राईट विंग किंवा सेंट्रल डिफेन्सीव्ह मिडफिल्डर आणि अंजलीला गोलरक्षक म्हणून खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारताचा 'A' गटात समावेश करण्यात आला असून त्यांच्यासमोर श्रीलंका व यजमान भुटानचे आव्हान असणार आहे.  'B' गटात बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. आमचा संघ समतोल आहे आणि हे खेळाडू सातत्याने प्रगती करत आहेत. सॅफ स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक संघाने मागील दोन वर्षांत बरीच प्रगती केलेली आहे. विशेष करून बांगलादेशने. मागील वर्षी त्यांनी आशिया अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवली होती. त्यामुळे सॅफ स्पर्धेत आम्हाला खडतर आव्हानाला सामोरो जावे लागणार आहे, असे मत भारतीय संघाचे प्रशिक्षक फर्मिन डी,सुजा यांनी व्यक्त केले.   भारतीय संघगोलरक्षक - तनू, मनिषा, अंजली बारकेबचाव - रितू देवी, नौरेम देवी, संगिता दास, कविता, सरिता सोरेंग, आर्या श्री, ज्योती कुमारीमध्यरक्षक - प्रियांका सुजीश, जान्हवी शेट्टी, अविका सिंग, पूनम, किरण, निशा, क्रितिना देवी, वर्षा, लिंडा कोमआक्रमण -  अंजु, मेहक लोबो, सुनिता मुंडा, एच. शिल्की देवी. 

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रFootballफुटबॉलSportsक्रीडा