footballer Ezequiel Lavezzi has made a complaint he is being blackmailed over sex videos svg | अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूचा गर्लफ्रेंडसोबत रोमान्स; ब्लॅकमेलरच्या हाती लागला Sex Video अन्...

अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूचा गर्लफ्रेंडसोबत रोमान्स; ब्लॅकमेलरच्या हाती लागला Sex Video अन्...

कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वांना घरीच थांबावे लागत आहे. अनेक फुटबॉलपटू आपल्या प्रिय व्यक्तीसोबत आलिशान घरात ऐंजॉय करत आहेत. पण, अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू एजेकिएल लवेजी हा अडचणीत सापडला आहे. 35 वर्षीय लवेजी त्याच्या गर्लफ्रेंडसह एका बेटावर लॉकडाऊनचा काळ ऐंजॉय करत आहे. पण, त्यांच्या या रोमान्सला ब्लॅकमेलरची नजर लागली आहे. लवेजी आणि त्याची गर्लफ्रेंड यांचा Sex Video ब्लॅकमेलरच्या हाती लागला असून तो आता फुटबॉलपटूकडे पैशांची मागणी करत आहे.

Video : डोळ्यावर पट्टी बांधलेल्या मुलाचं फुटबॉल कौशल्य पाहा; म्हणाल क्या बात, क्या बात...

त्या ब्लॅकमेलरनं ते सेक्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणार असल्याची धमकी लवेजीला दिली आहे. अर्जेंटिनाच्या वृत्तपत्रान ही बातमी प्रसिद्ध केली आहे. लवेजीनं स्थानिक पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. लवेजीनं गतवर्षी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. त्याला प्रत्येक व्हिडीओसाठी 5 हजार डॉलर देण्याची मागणी ब्लॅकमेलरनं केली आहे. म्हणजे जवळपास चार लाख रुपये ब्लॅकमेलरनं त्याच्याकडे मागितले आहेत. ते न दिल्यास त्याचे सेक्स व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी ब्लॅकमेलरनं दिली आहे.


लवेजी त्याची गर्लफ्रेंड आणि ब्राझिलियन मॉडल नतालिया बोरगेससोबत कॅरेबियन बेटांवर आहे. नतालियालाही ब्लॅकमेलरने अशीच धमकी दिली आहे.

 
लवेजीनं 2007मध्ये चिलीविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातून अर्जेंटिना संघात पदार्पण केले. 2008मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिना संघाचा तो सदस्य होता. 2014 मध्ये फिफा वर्ल्ड कप आणि 2015च्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत संघाला पोहचवण्यात त्याचाही वाटा होता. पण, 2015च्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. त्यान 51 सामन्यांत 9 गोल केले आहेत.  

मोहम्मद शमीला पत्नी हसीन जहाँमुळे मोठा धक्का; यंदाही मिळणार नाही अर्जुन पुरस्कार 

Photos : विराट-अनुष्काचे मुंबईतील घर पाहिलेत का? चला करूया सफर!

 जगायचं तरी कसं? लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या खेळाडूवर उपासमारीची वेळ

हार्दिक पांड्याच्या रोमँटिक उत्तरानं नताशा लाजली; TikTok व्हिडीओतून व्यक्त केल्या भावना

Web Title: footballer Ezequiel Lavezzi has made a complaint he is being blackmailed over sex videos svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.