शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

Live मॅचमध्ये फुटबॉलपटूवर अचानक पडली वीज, काही सेकंदातच झाला मृत्यू; Video 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 11:00 AM

मैदानावर अनेक प्रकारचे अपघात घडतात पण आकाशातून वीज पडल्यामुळे खेळाडूचा मृत्यू झाल्याचे तुम्ही कधी पाहिले किंवा ऐकले नसेल.  

मैदानावर अनेक प्रकारचे अपघात घडतात पण आकाशातून वीज पडल्यामुळे खेळाडूचा मृत्यू झाल्याचे तुम्ही कधी पाहिले किंवा ऐकले नसेल.  एफएलओ एफसी बांडुंग आणि एफबीआय सुबांग यांच्यातील मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यादरम्यान एका ३५ वर्षीय इंडोनेशियन खेळाडूचा मृत्यू झाला. सोमवारी  इंडोनेशियन मीडियामध्ये या दुःखद घटनेची बातमी आली. ही घटना स्टँडवरील एका व्हिडिओमध्ये देखील कैद झाली आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की मैदानावर फुटबॉल खेळत असलेल्या एका खेळाडूवर अचानक वीज पडली आणि काही सेकंदातच खेळाडूचा मृत्यू झाला.

इंडोनेशियातून उघडकीस आलेली ही दुसरी घटना आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अपघातानंतरही खेळाडूचा श्वासोच्छवास सुरू होता, मात्र दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी, २०२३ मध्ये सोराटिन अंडर-१३ चषकादरम्यान पूर्व जावाच्या बोजोंगोरो येथे एका तरुण फुटबॉल खेळाडूचा वीज पडून मृत्यू झाला होता. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि नंतर बोजोनेगोरो येथील इब्नू सिना रुग्णालयात त्याचे निधन झाले.

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या म्हणण्यानुसार सामना सुरू झाला तेव्हा हवामान स्वच्छ होते, पण कालांतराने ते बिघडले. रेफरीच्या नियमावलीनुसार, हवामानाचा विचार करून सामन्याचे आयोजन करणे ही त्याची जबाबदारी आहे.    राष्ट्रीय हवामान सेवेनुसार, जेव्हा वीज थेट एखाद्या व्यक्तीवर पडते, तेव्हा तो त्या लाइटनिंग चॅनेलचा भाग बनतो आणि बाहेर उभ्या असलेल्या अधिक लोकांना त्याचा फटका बसतो. अशा परिस्थितीत वीज पडताच ती प्रथम शरीराच्या वरच्या भागावर आदळते आणि त्यानंतर हा विद्युत प्रवाह संपूर्ण शरीरात वाहू लागतो. यानंतर ते तुमच्या हृदयावर आणि मज्जासंस्थेवर हल्ला करते ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. 

टॅग्स :FootballफुटबॉलSocial Viralसोशल व्हायरल