Live मॅचमध्ये फुटबॉलपटूवर अचानक पडली वीज, काही सेकंदातच झाला मृत्यू; Video 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 11:00 AM2024-02-13T11:00:21+5:302024-02-13T11:00:33+5:30

मैदानावर अनेक प्रकारचे अपघात घडतात पण आकाशातून वीज पडल्यामुळे खेळाडूचा मृत्यू झाल्याचे तुम्ही कधी पाहिले किंवा ऐकले नसेल.  

Football player dies on pitch after being hit by lightning in Indonesia, video   | Live मॅचमध्ये फुटबॉलपटूवर अचानक पडली वीज, काही सेकंदातच झाला मृत्यू; Video 

Live मॅचमध्ये फुटबॉलपटूवर अचानक पडली वीज, काही सेकंदातच झाला मृत्यू; Video 

मैदानावर अनेक प्रकारचे अपघात घडतात पण आकाशातून वीज पडल्यामुळे खेळाडूचा मृत्यू झाल्याचे तुम्ही कधी पाहिले किंवा ऐकले नसेल.  एफएलओ एफसी बांडुंग आणि एफबीआय सुबांग यांच्यातील मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यादरम्यान एका ३५ वर्षीय इंडोनेशियन खेळाडूचा मृत्यू झाला. सोमवारी  इंडोनेशियन मीडियामध्ये या दुःखद घटनेची बातमी आली. ही घटना स्टँडवरील एका व्हिडिओमध्ये देखील कैद झाली आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की मैदानावर फुटबॉल खेळत असलेल्या एका खेळाडूवर अचानक वीज पडली आणि काही सेकंदातच खेळाडूचा मृत्यू झाला.


इंडोनेशियातून उघडकीस आलेली ही दुसरी घटना आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अपघातानंतरही खेळाडूचा श्वासोच्छवास सुरू होता, मात्र दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी, २०२३ मध्ये सोराटिन अंडर-१३ चषकादरम्यान पूर्व जावाच्या बोजोंगोरो येथे एका तरुण फुटबॉल खेळाडूचा वीज पडून मृत्यू झाला होता. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि नंतर बोजोनेगोरो येथील इब्नू सिना रुग्णालयात त्याचे निधन झाले.


स्थानिक प्रसारमाध्यमांच्या म्हणण्यानुसार सामना सुरू झाला तेव्हा हवामान स्वच्छ होते, पण कालांतराने ते बिघडले. रेफरीच्या नियमावलीनुसार, हवामानाचा विचार करून सामन्याचे आयोजन करणे ही त्याची जबाबदारी आहे.  


 
राष्ट्रीय हवामान सेवेनुसार, जेव्हा वीज थेट एखाद्या व्यक्तीवर पडते, तेव्हा तो त्या लाइटनिंग चॅनेलचा भाग बनतो आणि बाहेर उभ्या असलेल्या अधिक लोकांना त्याचा फटका बसतो. अशा परिस्थितीत वीज पडताच ती प्रथम शरीराच्या वरच्या भागावर आदळते आणि त्यानंतर हा विद्युत प्रवाह संपूर्ण शरीरात वाहू लागतो. यानंतर ते तुमच्या हृदयावर आणि मज्जासंस्थेवर हल्ला करते ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो.
 

Web Title: Football player dies on pitch after being hit by lightning in Indonesia, video  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.