Fifa World Cup 2022 : पोरींनो नीट कपडे घाला, अन्यथा खावी लागेल 'जेल'ची हवा! फुटबॉल फॅन्सची वाढलीय डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 09:36 IST2022-11-17T09:36:23+5:302022-11-17T09:36:49+5:30
फुटबॉलचा सर्वात मोठी स्पर्धा FIFA World Cup 2022, येत्या रविवारी म्हणजेच २० नोव्हेंबरपासून कतारमध्ये सुरू होणार आहे आणि त्यासाठी चाहतेही सज्ज झाले आहेत.

Fifa World Cup 2022 : पोरींनो नीट कपडे घाला, अन्यथा खावी लागेल 'जेल'ची हवा! फुटबॉल फॅन्सची वाढलीय डोकेदुखी
फुटबॉलचा सर्वात मोठी स्पर्धा FIFA World Cup 2022, येत्या रविवारी म्हणजेच २० नोव्हेंबरपासून कतारमध्ये सुरू होणार आहे आणि त्यासाठी चाहतेही सज्ज झाले आहेत. पण, मध्य-पूर्व देशातील हा वर्ल्ड कप गेल्या काही काळापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मानवाधिकार उल्लंघनापासून ते देशात बनावट चाहते आणण्यापर्यंतच्या अनेक मुद्द्यांमुळे हा वर्ल्ड कप चर्चेत आला आहे. आता आणखी एक मुद्दा समोर आला आहे, जो वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच वादग्रस्त बनलेल्या गोष्टींच्या यादीत भर घालतो.
आपल्या फुटबॉल टीमला चिअर करण्यासाठी इतर देशांतून आलेल्या महिला चाहत्यांना नीट कपडे घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसे न केल्यास त्यांना कतार येथील कायद्यानुसार तुरुंगात जावे लागू शकते. कतारमधील कायद्यांनुसार महिलांना त्यांच्या शरीराचे अवयव सार्वजनिक ठिकाणी दाखवण्यास बंदी आहे आणि हा दंडनीय गुन्हा आहे. तथापि, फिफाच्या वेबसाइटवर असे म्हटले आहे की महिलांना त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याची परवानगी आहे, परंतु त्यांनी कतारमध्ये प्रचलित असलेल्या कायद्यांचा आदर आणि जाणीव ठेवली पाहिजे.
"लोक साधारणपणे त्यांच्या आवडीचे कपडे घालू शकतात. संग्रहालये आणि इतर सरकारी इमारतींसारख्या सार्वजनिक ठिकाणी भेट देताना पाहुण्यांनी त्यांचे खांदे आणि गुडघे झाकणे अपेक्षित आहे," असे फिफाची वेबसाइट सांगते. सनने दिलेल्या वृत्तानुसार, कतारमध्ये महिलांना शॉर्ट कपडे घालण्यास बंदी आहे.
गर्दीत कोणी पुरुष असो किंवा महिला यांनी सामना सुरू असताना त्यांचा शर्ट काढून जल्लोष केला, तरी त्यांना जेल होऊ शकते. स्टेडियममध्ये असे कॅमेरे आहेत की ते कृत्य पकडू शकतात आणि त्या व्यक्तीला तुरुंगात टाकू शकतात.
"आमच्याकडे विशिष्ट सीटवर झूम इन करण्यासाठी आणि प्रेक्षकाला स्पष्टपणे पाहण्यासाठी उच्च-रिझोल्यूशनचे विशेष कॅमेरे आहेत. ज्यामुळे आम्हाला कोणत्याही कार्यक्रमानंतरच्या तपासात मदत होईल," असे कतारमधील फिफा वर्ल्ड कपचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"