शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

Fifa World Cup 2018: जगात पहिल्यांदाच झाला 'असा' भूकंप; सुखद धक्क्याने जमीन 'हादरली'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 12:50 PM

बलाढ्य जर्मनीला नमवणाऱ्या मेक्सिकोच्या संघावर चाहते खूष

मेक्सिको: रविवारी फिफा वर्ल्ड कपमध्ये मेक्सिकोच्या संघानं गतविजेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का दिला. बलाढ्य जर्मनीवर मेक्सिकोनं धक्कादायक विजय मिळवल्यावर मेक्सिकोमध्ये चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मेक्सिकोच्या फुटबॉल संघाच्या चाहत्यांनी असा काही ठेका धरला की मानवनिर्मित भूकंप झाला. भूकंप मापन करणाऱ्या यंत्रणेनं याची नोंदही केली. मेक्सिकोच्या संघानं गोल डागताच चाहते नाचू लागले आणि भूकंपाची नोंद झाली. मेक्सिको विरुद्ध जर्मनी हा सामना पाहण्यासाठी फुटबॉल चाहते मेक्सिको सिटीतील प्रसिद्ध एंजल ऑफ इंडिपेंडन्ट्स स्मारकाजवळ गोळा झाले होते. मेक्सिकोचा झेंडा फडकावत ते गाणी म्हणत होते. सामन्याच्या 35 व्या मिनिटाला स्टार खेळाडू हिरविंग लोजानोनं गोल करताच चाहत्यांनी जबरदस्त जल्लोष केला. सर्वच चाहते आनंदाने नाचायला, उड्या मारायला लागले. यावेळी मेक्सिकोत दुपारचे 11 वाजून 32 मिनिटं झाली होती. मेक्सिकोच्या भूगर्भीय संशोधन संस्थेनं यावेळी भूकंपाची नोंद केली. लोजानोनं गोल करताच मेक्सिको सिटीत भूकंपाचा धक्का जाणवला, अशी माहिती भूगर्भीय संशोधन संस्थेनं दिली. हिरविंग लोजानोनं जर्मनीच्या गोलकिपरला चकवून गोल डागताच एंजल ऑफ इंडिपेंडन्ट्स स्मारकाजवळील चाहत्यांनी 'मेक्सिको, मेक्सिको, मेक्सिको' अशा घोषणा दिल्या. बलाढ्य जर्मनीला धक्का देणारा मेक्सिकोचा संघ पुढील फेरीत नक्की पोहोचेल, असा विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला. याशिवाय सध्या सोशल मीडियावर मेक्सिकोचा गोलकिपर गुलिमेरो ओचाओ याचंही कौतुक होत आहे.  

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Mexicoमेक्सिकोFootballफुटबॉलGermanyजर्मनी