शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

FIFA World Cup 2018 : पाहुणचारासाठी रशिया सज्ज; एक लाखाहून अधिक प्रेक्षक येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 1:55 AM

विश्वचषक फुटबॉलला १४ जूनपासून सुरुवात होत आहे. १५ जुलैपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभाचा थरार ‘याची देही याची डोळा’अनुभवण्यासाठी जगभरातील एक लाखाहून अधिक प्रेक्षक हजेरी लावण्याची शक्यता असल्याने यजमान रशिया पाहुण्यांच्या सरबराईस सज्ज झाला आहे.

मॉस्को : विश्वचषक फुटबॉलला १४ जूनपासून सुरुवात होत आहे. १५ जुलैपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभाचा थरार ‘याची देही याची डोळा’अनुभवण्यासाठी जगभरातील एक लाखाहून अधिक प्रेक्षक हजेरी लावण्याची शक्यता असल्याने यजमान रशिया पाहुण्यांच्या सरबराईस सज्ज झाला आहे.विश्वचषकाच्या तिकिटांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. कालपर्यंत २४ लाखाहून अधिक तिकिटे विकली गेली, असे फिफाने म्हटले आहे. त्यातील १५ लाखाहून अधिक तिकिटे रशियाच्या बाहेर विकली गेली. आतापर्यंत एक लाख तिकिटे प्रेक्षकांना देण्यात आल्याचे फिफाच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले.अमेरिकेचा संघ यंदा पात्रता गाठण्यात अपयशी ठरला. तरीही रशियापाठोपाठ सर्वाधिक तिकिटांची मागणी आली ती अमेरिकेतूनच. तेथे ८६,७१० तर ब्राझीलमध्ये ७१७८७, कोलंबियात ६४२३१ आणि जर्मनीत ६०४७५ तिकिटे विकली गेली. नेदरलँड संघ देखील यंदा अंतिम फेरीचा अडथळा पार करू शकलेला नाही. पण तेथील चाहतेही सामने पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. (वृत्तसंस्था)- यजमान रशियातील १२ शहरांतील सडकेवर जुलैपर्यंत विविध भाषा, गीते, ध्वज आणि विविध देशांची संस्कृती दृष्टीस पडणार आहे. रशियाने पायाभूत सुविधांवर १३ अब्ज डॉलरचा खर्च केला. आयोजन समितीचे प्रमुख अ‍ॅलेक्सेई सोरोकिन म्हणाले,‘ सहा यजमान शहरांमधील विमानतळांवर नवे टर्मिनल्स आणि यजमान शहरात २१ नवे हॉटेल्स उभारण्यात आले आहेत. स्पर्धेनिमित्त १४ रुग्णालयांची देखील उभारणी करण्यात आली आहे.’चाहत्यांनी तब्येतीची काळजी घ्यावीविश्वचषकाचे आयोजन ही फुटबॉल चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असली, तरी या काळात कुटुंबीय आणि मित्रांसोबत मौजमस्तीत रंगलेल्या फुटबॉलप्रेमींनी तब्येतीची काळजी न घेतल्यास ते आजारी पडू शकतात. अशावेळी जीव गमवावा लागू शकतो.या संदर्भात संशोधकांनी आरोग्य जपण्याच्या टिप्स दिल्या असून कार्डिओव्हॅस्क्यूलर (हृदयरोग)अपघातापासून बचाव करण्यास सांगितलेआहे. चाहत्यांना अतिआनंदामुळे हृदयगती बंद पडण्याचा धोका असतो. आयोजनादरम्यान असुरक्षित संभोग, अपघात, आत्महत्या आणि हिंसाचारात वाढ होण्याची शक्यता असते.अमेरिकन जर्नल आॅफ मेडिसिनच्या २०१० च्या अंकात प्रकाशित शोध प्रबंधात मोठ्या स्पर्धेदरम्यान हृदयाघात होण्याचेप्रमाण अधिक असल्याचे म्हटले आहे.आपल्या पसंतीचा संघ हरला किंवा जिंकला तरी हृदयरुग्ण तणावाच्या स्थितीत असतात. आपला संघ गोल नोंदविण्यात अपयशी ठरला किंवा प्रतिस्पर्धी संघाने गोल नोंदविला कीकमकुवत हृदय असलेल्या लोकांच्या मनावर विपरीत परिणामहोतो, असे पाहणीत आढळून आले आहे. हृदयरोग पीडितांनी फुटबॉलसारख्या खेळाचा केवळ आनंद लुटावा, जय- पराजय मनाला लावून घेऊ नये, असा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉल