शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

Fifa World Cup 2018: रोनाल्डोने ९ वर्षांपूर्वीही 'सेम टू सेम' असाच गोल केला होता!... बघा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 11:56 IST

५८व्या मिनिटाला स्पेननं तिसरा गोल झळकावला आणि पोर्तुगालचा संघ २-३ असा पिछाडीवर पडला. वेळ पुढे सरकत होता आणि सामना संपायला फक्त चार मिनिटं शिल्लक होती.

मॉस्कोः जगातील सार्वकालिक महान फुटबॉलपटूंच्या यादीत विराजमान असलेल्या पोर्तुगालच्या ख्रिस्टियानो रोनाल्डोनं फिफा वर्ल्ड कपमधील स्पेनविरुद्धच्या सामन्यात आपला करिष्मा पुन्हा दाखवून दिला. 'वन मॅन आर्मी' मानल्या जाणाऱ्या रोनाल्डोनं एकापाठोपाठ एक तीन गोल झळकावून पोर्तुगालचा पराभव टाळला आणि सामना बरोबरीत सोडवला. रोनाल्डोच्या फ्री किकवरच्या गोलनं तर चाहत्यांना पार याड लावलं. पण 'सेम टू सेम' तसाच गोल या 'सुपरमॅन'नं साधारण ९ वर्षांपूर्वीही केला होता. त्याचा व्हिडिओ एका रोनाल्डो फॅननं ट्विटरवरून शेअर केलाय.   

५८व्या मिनिटाला स्पेननं तिसरा गोल झळकावला आणि पोर्तुगालचा संघ २-३ असा पिछाडीवर पडला. वेळ पुढे सरकत होता आणि सामना संपायला फक्त चार मिनिटं शिल्लक होती. तेव्हा, फ्री किकच्या रूपाने त्यांना बरोबरी साधण्याची संधी चालून आली आणि रोनाल्डोनं तिचं सोनं केलं. आधीच दोन गोल करून त्यानं आपली जादू दाखवली होती. त्यामुळे अपेक्षांचं फार मोठं ओझं त्याच्यावर होतं. अख्ख्या पोर्तुगालला त्याच्याकडून आशा होत्या. हे ओझं समर्थपणे पेलत त्यानं तिसरा गोल करून या वर्ल्ड कपमधील पहिली हॅटट्रिक साजरी केली. त्याच्या या किकचा वेग होता ताशी १०० किलोमीटर. अवघ्या  ०.८२ सेकंदात चेंडू गोलपोस्टच्या जाळीवर आदळला आणि स्टेडियममध्ये एकच कल्ला झाला. 

अगदी असाच गोल रोनाल्डोनं प्रीमिअर लीगमध्ये मॅन्चेस्टर युनायटेड संघाकडून खेळताना केला होता. २००३ ते २००९ ही सहा वर्षं तो मॅन्चेस्टर युनायटेडचा शिलेदार होता. त्या दरम्यान एका सामन्यात त्यानं अशीच फ्री किक हाणली होती आणि प्रतिस्पर्धी बघत राहिले होते. हा गोल पाहून, ९ वर्षांनंतरही रोनाल्डोची क्षमता - फिटनेस तसूभरही कमी झाली नसल्याची प्रचिती येते. 

 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डो