शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

फिफा अंडर-१७ विश्वकप फुटबॉल : भारताची नजर सर्वोत्तम कामगिरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 11:36 IST

भारतीय संघ शुक्रवारी अमेरिकेविरुद्ध फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेच्या सलामी लढतीसाठी जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये उतरेल त्या वेळी इतिहास नोंदविला जाणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय संघ शुक्रवारी अमेरिकेविरुद्ध फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेच्या सलामी लढतीसाठी जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये उतरेल त्या वेळी इतिहास नोंदविला जाणार आहे. भारतीय संघाची नजर मैदानावरील निकालाची चिंता न करता सर्वोत्तम कामगिरी करण्यावर व आवश्यक अनुभव घेण्यावर केंद्रित झालेली असेल.मणिपुरी मिडफिल्डर अमरजित सिंग कियाम अँड कंपनी कुठल्याही फिफा स्पर्धेत सहभागी होणारा पहिला भारतीय संघ ठरणार आहे. हे भाग्य बायचुंग भुतिया, आय.एम. विजयन आणि सुनील छेत्री यांच्यासारख्या दिग्गज फुटबॉलपटूंनाही लाभले नाही. ६० वर्षांपूर्वी भारताने उरुग्वेमध्ये (त्या वेळी निमंत्रित संघांना स्पर्धेत प्रवेश मिळायचा) १९५० मध्ये विश्वकप स्पर्धेत सहभागी होण्याचे मिळालेले निमंत्रण बूट घालून खेळावे लागणार असल्यामुळे फेटाळले होते. त्यानंतर अंडर-१७ संघ विश्वकप स्पर्धेत सहभागी होणारा पहिला संघ ठरणार आहे.अमेरिका, कोलंबिया आणि दोनदा जेतेपद पटकावणाºया घाना यांच्यासह कठीण गट ‘अ’ मध्ये समावेश असलेल्या भारतीय संघाला निश्चितच २४ संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेत पुढची फेरी गाठण्याचा दावेदार मानले जात नाही, पण संघातील खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक आहेत.यात अमेरिका संघ प्रबळ दावेदार आहे. या संघातील जास्तीत जास्त खेळाडू प्रतिष्ठेच्या लीगमध्ये युवा संघातर्फे खेळलेले आहेत, तर काही आघाडीच्या युरोपियन क्लबतर्फे खेळण्यास सज्ज आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक लुई नोर्टन डी माटोस यांना खेळाडूंसोबत तयारी करण्यासाठी केवळ आठ महिन्यांचा कालावधी मिळालेला आहे, पण त्यांना खेळाडूंकडून चमकदार कामगिरीचा विश्वास आहे. संघ कुठल्याही लढतीत पराभूत झाला नाही आणि प्रत्येक लढत बरोबरीत सोडविण्यात यशस्वी ठरला तरी चांगला निकाल मिळाल्याचे समाधान राहील, असे मोटास यांचे मत आहे. प्रशिक्षक मोटास यांना खेळाडूंनी कुठलेही दडपण न बाळगता व मिळालेली संधी न गमाविता खेळावे, असे वाटते. अमेरिकेविरुद्धच्या लढतीबाबत बोलताना ते म्हणाले, ‘‘प्रतिस्पर्धी संघाचे आक्रमण मजबूत असल्यामुळे आम्हाला बचाव मजबूत करावा लागेल.’’अमेरिकेचे मुख्य प्रशिक्षक जॉन हेकवर्थ यांनी भारताला कमी लेखण्याची चूक करणार नसल्याचे स्पष्ट करीत सांगितले, ‘‘आम्ही यापूर्वी एकदा भारताविरुद्ध खेळलो असून त्यांच्याविरुद्ध यशस्वी ठरलो होतो; पण ही विश्वकप स्पर्धेची सलामी लढत आहे. त्यांना स्थानिक चाहत्यांना पाठिंबा मिळणार आहे.’’ (वृत्तसंस्था)न्यूझीलंड, तुर्की नवी मुंबईत भिडणार;डी. वाय. पाटील स्टेडियम सज्जमुंबई : शुक्रवारपासून भारतात १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचा बिगुल वाजत असून या जागतिक सोहळ्यासाठी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमही सज्ज झाले आहे. येथे स्पर्धेच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंड आणि तुर्की सलामीच्या सामन्यात एकमेकांविरुद्ध भिडतील. विशेष म्हणजे, न्यूझीलंडने सराव सामन्यात बलाढ्य संघांना झुंजायला लावले होते. त्यामुळेच त्यांना १७ वर्षांखालील युरो कप स्पर्धेत सेमीफायनल गाठलेल्या तुर्कीला कडवी लढत देण्याचा विश्वास आहे.सायंकळी ५ वाजता न्यूझीलंड - तुर्की सामना झाल्यानंतर याच ठिकाणि रात्री ८ वाजता पॅराग्वे विरुद्ध माली हा सामना रंगेल. सराव सामन्यात न्यूझीलंडच्या बचावफळीतील कमजोरी समोर आल्या आणि त्यामुळेच प्रशिक्षक डॅनियल हे यांच्यापुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. हे यांनी सामन्याच्या आधी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, की सराव सामन्यातील कामगिरी चांगली झाली. या सामन्यांद्वारे आम्ही आमचा खेळ अजमावून पाहिला. तसेच, आम्हाला आमच्या मजबूत गोष्टी व कमजोरीदेखील कळाल्या.भारतीय संघाला सचिनकडून शुभेच्छा...उद्यापासून सुरू होणाºया विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाºया भारतीय संघाला शुभेच्छा....पंतप्रधान उपस्थित राहणारशुक्रवारी सायंकाळी स्पर्धेपूर्वी होणाºया छोट्याशा उद्घाटन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या निमंत्रणाचा पंतप्रधानांनीस्वीकार केला आहे.प्रतिस्पर्धी संघभारत :- धीरज सिंग, प्रभसुखन गिल, सन्नी धालीवाल, जितेंद्र सिंग, अन्वर अली, संजीव स्टालिन, हेंड्री एंटोनी, नमित देशपांडे, सुरेश सिंग, निनथोइंगानबा मितेई, अमरजित सिंग कियाम, अभिजित सरकार, कोमल थाटल, लालेनंगमाविया, जॅक्सन सिंग, नोंगदाम्बा नाओरेम, राहुल कनोली प्रवीण, मोहम्मद शाहजहां, रहीम अली आणि अनिकेत जाधव.अमेरिका :- अ‍ॅलेक्स बुडनिक, कार्लोस जोकिम दोस सांतोस, जस्टिन गार्सेस, सर्गिनो डेस्ट, ख्रिस्टोफर ग्लोस्टर, जयलिन लिंडसे, जेम्स सँड््स, टेलर शावेर, अकिल वाटर्््स जॉर्ज एकोस्टा, टेलर बुथ, ख्रिस्टोफर डुर्किन, ब्लेन फेरी, ख्रिस गोसालिन, इंडियाना वासिलेव, अयो अकिनोला, अ‍ॅण्ड्य्रू कार्लेटन, जोकोबो रेयेस, ब्रायन रेनाल्ड््स, जोशुआ सर्जेंट, टीम व्ही.सामना : भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजतास्थळ : जवाहरलाल नेहरू स्टेडियम, नवी दिल्ली

टॅग्स :FootballफुटबॉलSportsक्रीडा2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017