FIFA Football World Cup 2018 : 'हे' आहेत 'स्पेशल-16'; बघा आता कोण कुणाशी भिडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 17:02 IST2018-06-29T16:59:54+5:302018-06-29T17:02:53+5:30

गुरूवारी मध्यरात्री पनामा विरूद्ध ट्युनिशिया आणि इंग्लंड विरुद्ध बेल्जियम या अखेरच्या साऴखी सामन्यांनंतर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील ' स्पेशल-16' निश्चित झाले आहेत. बघा आता कोण कुणाशी भिडणार!

FIFA Football World Cup 2018: These are 'special -16' | FIFA Football World Cup 2018 : 'हे' आहेत 'स्पेशल-16'; बघा आता कोण कुणाशी भिडणार!

FIFA Football World Cup 2018 : 'हे' आहेत 'स्पेशल-16'; बघा आता कोण कुणाशी भिडणार!

ठळक मुद्देफ्रांस वि. अर्जेंटिना लढतीने बाद फेरीची सुरूवात

मॉस्को -  ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या जगातील दोन सर्वोत्तम खेऴाडूंप्रमाणे अनेक जण देशवासियांच्या अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन रशियात दाखल  झाले. यातील काहींना यश आले, पण काहींना निराश चेह-यांनी रित्या हाताने माघारी फिरावे लागले. 
गतविजेत्या जर्मनीच्या वाट्याला आलेले अपयश पचवणे अजूनही कठीण जात आहे. हे धक्कातंत्र आता पुढेही कायम राहणार आहे. मात्र, यावेऴी आव्हान टिकवण्यासाठी कोणालाही दुसरी संधी मिऴणार नाही.. शनिवारपासून बाद फेरीचा थरार सुरू होत आहे. 
 गुरूवारी मध्यरात्री पनामा विरूद्ध ट्युनिशिया आणि इंग्लंड विरुद्ध बेल्जियम या अखेरच्या साऴखी सामन्यांनंतर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील ' स्पेशल-16' निश्चित झाले आहेत. बघा आता कोण कुणाशी भिडणार!
30 जून
फ्रान्स वि. अर्जेंटिना - सायं. 7.30 वा.
उरूग्वे वि. पोर्तुगाल - रात्री 11.30 वा.
01 जूलै 
स्पेन वि. रशिया - सायं. 7.30 वा.
क्रोएशिया वि. डेन्मार्क - रात्री 11.30 वा.
02 जूलै 
ब्राझील वि. मेक्सिको - सायं. 7.30 वा.
बेल्जियम वि. जपान - रात्री 11.30 वा.
03 जूलै
स्वीडन वि. स्वित्झर्लंड - सायं. 7.30 वा.
कोलंबिया वि. इंग्लंड - रात्री 11.30 वा.
 
Web Title: FIFA Football World Cup 2018: These are 'special -16'