FIFA Football World Cup 2018 : स्वित्झर्लंडच्या आक्रमणाला स्वीडनचे बचावाने चोख उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 20:22 IST2018-07-03T20:21:51+5:302018-07-03T20:22:32+5:30
फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या उपपांत्यपूर्व लढतीच्या पहिल्या सत्रात स्वित्झर्लंडने जोरदार आक्रमण लगावले, पण त्यांचा या आक्रमणाला स्वीडनने दमदार बचाव करत चोख उत्तर दिले.

FIFA Football World Cup 2018 : स्वित्झर्लंडच्या आक्रमणाला स्वीडनचे बचावाने चोख उत्तर
सेंट पिटर्सबर्ग - फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या उपपांत्यपूर्व लढतीच्या पहिल्या सत्रात स्वित्झर्लंडने जोरदार आक्रमण लगावले, पण त्यांचा या आक्रमणाला स्वीडनने दमदार बचाव करत चोख उत्तर दिले. पहिल्या सत्रात स्वित्झर्लंडने 65 टक्के चेंडूवर ताबा ठेवला, त्यांनी स्वीडनपेक्षा पासेसही जास्त केले. पण स्वीडनपेक्षा जास्त आक्रमण करून स्वित्झर्लंडला गोल करण्यात अपयश आले. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करता आला नाही आणि हे सत्र 0-0 बरोबरीत राहिले.
No goals yet. #SWESUIpic.twitter.com/PVNfQunpAZ
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) July 3, 2018
स्वित्झर्लंडने गेल्या 25 सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. गेल्या 25 सामन्यांमध्ये स्वित्झर्लंडने 17 लढती जिंकल्या आहेत, तर सात सामने त्यांनी बरोबरीत सोडवले आहेत. फक्त एका सामन्यात स्वित्झर्लंडला पराभव पत्करावा लागला आहे. पण स्वीडनबरोबरच्या तीन सामन्यांमध्ये स्वित्झर्लंडला एकदाही विजय मिळवता आलेला नाही. या तीन लढतीमध्ये स्वीडनने एक सामना जिंकला आहे, तर दोन सामने बरोबरीत सुटले आहेत.