शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

FIFA FOOTBALL World Cup 2018: ग्रानिट झाका, शकिरी यांची चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 2:17 AM

फिफा विश्वचषक स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सर्बियाविरुद्धच्या सामन्यात गोल केल्यानंतर स्वित्झर्लंडच्या ग्रानिट झाका व झारडेन शकिरी यांनी ‘विशिष्ट’ हातवारे केले होते.

मॉस्को : फिफा विश्वचषक स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सर्बियाविरुद्धच्या सामन्यात गोल केल्यानंतर स्वित्झर्लंडच्या ग्रानिट झाका व झारडेन शकिरी यांनी ‘विशिष्ट’ हातवारे केले होते. त्यांच्या या कृत्याची फिफाने चौकशी सुरू केली आहे.स्वित्झर्लंडने चुरशीच्या झालेल्या सामन्यात सर्बियावर २-१ अशा गोलने मात केली होती. हे गोल झाल्यानंतर झाका व शकिरी यांनी आनंदोत्सव करताना आपल्या हातांनी गरुडाचे चिन्ह तयार केले होते. हे चिन्ह अल्बानियाच्या ध्वजाचे प्रतिनिधित्व करते, असे मानले जात आहे. त्यामुळे या दोन खेळाडूंनी कोसोवोच्या समर्थनासाठीच हे कृत्य केल्याचा संशय आहे.कोसोवोमध्ये राहणारे अनेक लोक अल्बानियन वंशाचे आहेत. हे दोन्हीखेळाडू सर्बियाचा पूर्व भाग कोसोवोचे मूळ रहिवासी आहेत. कोसोवोने २००८ मध्ये स्वत:ला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले. मात्र, सर्बियाने अद्याप त्याला मान्यता दिलेली नाही.फिफाने मैदानात कोणत्याही प्रकारच्या राजकीय संदेश व प्रतीकांवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे या नियमाचे उल्लंघनकेल्याचे आढळल्यास झाका व शकिरी यांच्यावर दोन सामन्यांसाठी बंदी घातली जाऊ शकते.त्याचबरोबर फिफाने सर्बियाच्या प्रशिक्षकांचीही चौकशी सुरू केली आहे. सर्बियाच्या प्रशिक्षकांनी जर्मनीचे पंच फेलिक्स ब्राइच यांच्याविषयी वादग्रस्त टिप्पणी केली होती.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८