शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

FIFA Football World Cup 2018 : स्वित्झर्लंडच्या संघावर फेडरर भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 21:47 IST

स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने वेळात वेळ काढून विश्वचषक स्पर्धेत खेळत असलेल्या त्याच्या राष्ट्रीय संघाचा खेळ पाहीला, परंतु त्याच्या वाट्याला प्रचंड निराशा आली. त्यानंतर भडकलेल्या फेडररने राष्ट्रीय फुटबॉलपटूंची कानउघडणी केली.

ठळक मुद्देस्वीडनने अनपेक्षित निकाल नोंदवताना 1-0 असा विजय मिळवून स्वित्झर्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.

विम्बल्डन - फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आणि विम्बल्डन टेनीस स्पर्धा यांच्यातील वेळा समान असल्यामुळे टेनिसपटू अँडी मरेने नाराजी प्रकट केली होती. मात्र स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने वेळात वेळ काढून विश्वचषक स्पर्धेत खेळत असलेल्या त्याच्या राष्ट्रीय संघाचा खेळ पाहीला, परंतु त्याच्या वाट्याला प्रचंड निराशा आली. त्यानंतर भडकलेल्या फेडररने राष्ट्रीय फुटबॉलपटूंची कानउघडणी केली. शांत स्वभावाच्या फेडररने मंगळवारी स्वित्झर्लंड आणि स्वीडन यांच्यातील बाद फेरीतील लढत आवर्जुन पाहिली. या लढतीत स्वित्झर्लंडचे पारडे जड मानले जात होते. मात्र स्वीडनने अनपेक्षित निकाल नोंदवताना 1-0 असा विजय मिळवून स्वित्झर्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. तत्पूर्वी इ गटातील पहिल्याच सामन्यात त्यांनी बलाढ्य ब्राझिलला बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला होता.  त्यात त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत धडक देताना चाहत्यांच्या आशा उंचावल्या होत्या. त्यात फेडररचाही समावेश होता. मी संघाकडून बरीच अपेक्षा केली होती. पण त्यांनी मला निराश केले, अशा शब्दात फेडररने नाराजी प्रकट केली. तो पुढे म्हणाला, बाद फेरीत असा निकाल अपेक्षीत नव्हता. स्वीडनविरूद्ध आम्हाला विजयाची संधी होती, पण ती आम्ही गमावली. आमच्या खेळाडूंनी गोल करण्याचे प्रयत्नही केले नाही. असा खेळ केल्यावर संघ उपांत्यपूर्व फेरीत जाण्यास पात्रच नव्हता, असे मला वाटते.   

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Roger fedrerरॉजर फेडररSwitzerlandस्वित्झर्लंडFootballफुटबॉलSportsक्रीडा