FIFA Football World Cup 2018 : वर्चस्व गाजवूनही इंग्लंडची पाटी कोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 00:21 IST2018-07-04T00:16:44+5:302018-07-04T00:21:27+5:30
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत इंग्लंडला पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवूनही कोलंबियाने गोलशून्य बरोबरीत रोखले.

FIFA Football World Cup 2018 : वर्चस्व गाजवूनही इंग्लंडची पाटी कोरी
मॉस्को - फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत इंग्लंडला पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवूनही कोलंबियाने गोलशून्य बरोबरीत रोखले. या लढतीत सर्वाधिक प्रेक्षक हे इंग्लंडच्या बाजूने होते. तरीही त्यांना कोलंबियाचा बचाव भेदण्यात अपयश आले.
A fourth consecutive 0-0 half-time scoreline in the #WorldCup
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) July 3, 2018
Man, the knock-out stage is tense. #COLENGpic.twitter.com/s9LWkiYRGB
संघाचा प्रमुख खेळाडू जेम्स रॉड्रीगेच दुखापतीमुळे या लढतीला मुकला. त्याही परिस्थितीत कोलंबियाने कौतुकास्पद खेळ केला. 41 व्या मिनिटाला पेनल्टी क्षेत्राबाहेरून मिळालेल्या फ्री किकवर इंग्लंडच्या खेळाडूला अपयश आले. सामन्याच्या सुरुवातीलाच हॅरी केनने हेडरव्दारे गोल करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला.
An early chance for @HKane...
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) July 3, 2018
Will he score tonight? #COLENG 0-0 pic.twitter.com/6k1PnmVLGI