शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

FIFA Football World Cup 2018 : बेल्जियमनं सामना जिंकला, तर जपाननी मनं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 01:39 IST

रोस्तोव ऑन डॉन : उंचीने कमी पण निर्धाराने मजबूत असलेल्या जपानने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य बेल्जियमला झगडण्यास भाग पाडले.  एक्स्ट्रा टाईमच्या अखेरच्या मिनिटाला नेसर चॅडलीने गोल करताना बेल्जियमला 3-2 असा विजय मिळवून दिला.

रोस्तोव ऑन डॉन : उंचीने कमी पण निर्धाराने मजबूत असलेल्या जपानने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य बेल्जियमला झगडण्यास भाग पाडले.  एक्स्ट्रा टाईमच्या अखेरच्या मिनिटाला नेसर चॅडलीने गोल करताना बेल्जियमला 3-2 असा विजय मिळवून दिला.बेल्जियमच्या उंचपुऱ्या आणि तगड्या असलेल्या खेळाडूंना जपानच्या खेळाडूंनी तोडीसतोड उत्तर दिले. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात जपानच्या खेळाडूंनी पहिल्या सत्रात बेल्जियमला गोलशून्य बरोबरीत रोखले. बेल्जियमपेक्षा जपानचा खेळ सरस ठरला. बेल्जियमचे बहुतांशी खेळाडू टॉप लीगमध्ये प्रतिनिधित्व करतात. तरीही त्यांना जपानच्या  खेळाडूंनी झुंजवले.मध्यंतराच्या तिस-याच मिनिटाला जपानने उत्तम सम्नवयाचा खेळ करताना 1-0 अशी आघाडी घेतली. गाकू शिबासाकीच्या पासवर गेंकी हारागुचीने मध्यरेषेपासून चेंडूवर ताबा मिळवत बेल्जियमच्या गोलरक्षकाला अचूकपणे चकवले. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात जपानकडून बाद फेरीत गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरला. बेल्जियमकडून त्याला त्वरीत उत्तर मिळाले असते, परंतु इडन हॅजार्डचा तो प्रयत्न गोलपोस्टला लागून अपयशी ठरला. 52व्या मिनिटाला तकाशी इनुईने जपानच्या खात्यात आणखी भर टाकून बेल्जियमवरील दडपण वाढवले. जॅन व्हेर्टोंझेनने बेल्जियमला पुनरागमनाची संधी मिळवून दिली. व्हेर्टोंझेनने जजमेंट घेत हेडरव्दारे टोलावलेला चेंडू अगदी सहज गोलजाळीत विसावला. 74 व्या मिनिटाला हॅजार्डच्या पासवर मॅरौने फेल्लानीने हेडरव्दारे आणखी एका गोलची भर घातली आणि बेल्जियमने सामना 2-2 असा बरोबरीत आणला. त्यानंतर सामन्यातील चुरस वाढली. बेल्जियमकडून एकामागोमाग एक प्रयत्नांचा सपाटा लावला. जपानच्या खेळाडूंनी आघाडीच्या सोप्या संधी गमावल्या. 86व्या मिनिटाला जपानचा गोलरक्षक इजी कावाशीमाने बेल्जियमचे सलग तीन प्रयत्न सुरेखरित्या अडवले. एक्स्ट्रा टाईमच्या अखेरच्या मिनिटाला नेसर चॅडलीने गोल करताना बेल्जियमला 3-2 असा विजय मिळवून दिला.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलSportsक्रीडा