शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

FIFA Football World Cup 2018 : 25  दिवसांत त्यांनी प्रशिक्षकपद सोडले; कोण आहेत माजी विजेत्यांचे नवे गुरू ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 10:23 PM

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेपूर्वी सुरू झालेले प्रशिक्षकपदाच्या गच्छंतीचे सत्र स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर कायम राहिल्याने स्पेन संघ सध्या चर्चेत आहे.

मॉस्को - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेपूर्वी सुरू झालेले प्रशिक्षकपदाच्या गच्छंतीचे सत्र स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर कायम राहिल्याने स्पेन संघ सध्या चर्चेत आहे. स्पेनच्या मावळत्या प्रशिक्षकांचा कार्यकाळ हा अवघ्या 25 दिवसांचा असल्याने सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. विश्वचषक स्पर्धेत स्पेनचे आव्हान बाद फेरीत यजमान रशियाने संपुष्टात आणले. पेनल्टी शूटआऊटमध्ये गेलेल्या या लढतीत रशियाने 4-3 (1-1) अशी बाजी मारली. त्यामुळे 2010च्या विश्वविजेत्या स्पेनला गाशा गुंडाळावा लागला होता. त्यानंतर प्रशिक्षक फर्नांडो हिएरो यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वी प्रशिक्षक ज्युलेन लोपेटेगुई यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांनी फेडरेशनला कोणतिही कल्पना न देता रेयाल माद्रिद क्लबचे प्रशिक्षकपद स्वीकारले होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. हिएरो यांच्या जागी बार्सिलोना क्लबचे माजी प्रशिक्षक ल्युईस एनरीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 48 वर्षीय एनरीक यांच्या मार्गदर्शनाखाली बार्सिलोनाने 9 जेतेपद पटकावली आहेत. स्पेनचे माजी खेळाडू असलेल्या एनरीक यांनी 62 सामन्यांत 12 गोल्स केले आहेत. तसेच ते 1992च्या ऑलिम्पिक विजेत्या स्पेनच्या संघातील सदस्य होते. त्याशिवाय त्यांनी विश्वचषक आणि युरो स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.  

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलSportsक्रीडा