शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

FIFA U-17 World Cup : नवी मुंबईत ‘फिफा’ फिव्हर, देश-विदेशातील क्रीडा रसिकांची विश्वचषकासाठी उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 03:29 IST

१७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेनिमित्त नवी मुंबईही ‘फिफा’मय झाली आहे. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअममधील पहिली मॅच पाहण्यासाठी देश-विदेशातील क्रीडा रसिकांनी गर्दी केली होती

नवी मुंबई : १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेनिमित्त नवी मुंबईही ‘फिफा’मय झाली आहे. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअममधील पहिली मॅच पाहण्यासाठी देश-विदेशातील क्रीडा रसिकांनी गर्दी केली होती. स्पर्धेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रसिकांना बॅग व इतर साहित्य मैदानामध्ये घेऊन जाण्यावरही निर्बंध घातले होते.नवी मुंबईमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची फुटबॉल मॅच होणार असल्याने क्रीडा रसिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. न्यूझिलंड व तुर्की यांच्यामध्ये ५ वाजता पहिला सामना होणार असल्याने दुपारी २ नंतर पे्रक्षकांनी स्टेडिअम परिसरामध्ये येण्यास सुरुवात केली. ३ वाजल्यापासून प्रत्यक्ष स्टेडिअममध्ये प्रवेश देण्यास सुरुवात झाली. क्रीडा रसिकांचा गोंधळ होऊ नये व अपघात टाळण्यासाठी स्टेडिअमसमोर पत्र्याचे कुंपण घालण्यात आले होते. प्रेक्षकांची कसून तपासणी करूनच आतमध्ये पाठविण्यात येत होते.शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट विक्रीसामने सुरू होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट विक्री सुरू होती. फुटबॉलची क्रेझ पाहता आंतरराष्ट्रीय सामने पाहण्यासाठी याठिकाणी सामन्यांना सुरुवात झाली असूनही तिक ीट विक्री मात्र सुरूच होती. याठिकाणी असलेल्या तिकीट विक्री केंद्रावरही पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला होता.राज्याच्या कानाकोपºयातून फुटबॉलप्रेमीपुणे, नाशिक, औरंगाबाद, रायगड, नागपूर आदी राज्यांतूनही फुटबॉलप्रेमींनी या ठिकाणी हजेरी लावली होती. आंतरराष्ट्रीय सामने पहिल्यांदाच भारतात होत असल्याने, यातून फुटबॉल खेळाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी प्रचंड गर्दी करण्यात आली होती. दुपारपासूनच प्रवेशद्वारावर परगावाहून आलेल्या फुटबॉलप्रेमींची गर्दी पाहायला मिळाली.स्वच्छतेवर विशेष भरस्वच्छ शहरांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या नवी मुंबईत फुटबॉलच्या सामन्यांकरिता जगभरातून फुटबॉलप्रेमींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. महानगरपालिकेच्या वतीने शहरातील स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर देत शहराच्या सौंदर्यात बाधा येणार नाही याची पुरेपूर दखल घेतली. संपूर्ण स्टेडिअम परिसरात ओल्या आणि सुक्या कचºयासाठी स्वतंत्र कचरापेट्या ठेवण्यात आल्या होत्या. या संपूर्ण परिसरात प्लास्टीकच्या वापरावर बंदी ठेवण्यात आली होती.चोख सुरक्षास्डेडिअमच्या सर्वच बाजूंनी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. मुख्य मार्ग वगळता इतर मार्गांवर बॅरिगेट्स लावून वाहनांना बंदी घालण्यात आली होती. त्याशिवाय पार्किंगला बंदी असतानाही रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा होण्याची शक्यता होती. रस्त्यावर उभी असलेली अशी वाहने वाहतूक पोलिसांमार्फत टोविंग व्हॅनद्वारे तत्काळ उचलली जात होती. यामुळे स्टेडिअमभोवती कुठेही वाहतुकीला अडथळा निर्माण झाला नाही.विद्यार्थ्यांमध्ये उत्साहजगभरात फुटबॉल खेळाचे फॅड वाढत चालले असून, याठिकाणी सामने पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांना सामन्यांविषयी असलेली माहिती तसेच खेळणाºया संघांविषयी देखील पुरेशी माहिती होती. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये त्यांच्या आवडत्या खेळाडंूना पाहण्यासाठीची उत्सुकता चेहºयावर पाहायला मिळाली. स्टेडिअमच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या शिक्षकांमध्ये आंतरराष्ट्रीय सामने पाहण्याचे विशेष आकर्षण पाहायला मिळाले. याठिकाणी एनएमएमटी बसेसच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची ने-आण केली जात होती.विद्यार्थ्यांची गैरसोयसुरक्षेच्या कारणावरून घातक वस्तू व पदार्थांसह बॅग, खाद्यपदार्थ, पाणी स्टेडिअममध्ये नेण्यास मज्जाव करण्यात आला होता. याची पूर्वकल्पना शाळांना नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मात्र काहीशी गैरसोय झाली. बहुतांश विद्यार्थ्यांनी सोबत खाद्यपदार्थ आणले होते. शिवाय, शाळेकडूनही त्यांना बिस्कीट व पाण्याची बॉटल देण्यात आली होती. विद्यार्थ्यांना खाऊ स्टेडिअमबाहेरच फस्त करावा लागला.

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017FootballफुटबॉलSportsक्रीडाNavi Mumbaiनवी मुंबई