इपीएल : मँचेस्टर युनायटेडकडून चेल्सीचा पराभव, रोमेलू लूकाकूचा निर्णायक खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:17 IST2018-02-27T01:17:28+5:302018-02-27T01:17:28+5:30

रोमेलू लूकाकूने नोंदवलेल्या गोलच्या बळावर मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबाल स्पर्धेमधील सामन्यात तुल्यबळ चेल्सीचा २-१ ने पराभव केला.

EPL: Chelsea defeat by Manchester United, crucial game of Romelu Lukaku | इपीएल : मँचेस्टर युनायटेडकडून चेल्सीचा पराभव, रोमेलू लूकाकूचा निर्णायक खेळ

इपीएल : मँचेस्टर युनायटेडकडून चेल्सीचा पराभव, रोमेलू लूकाकूचा निर्णायक खेळ

मँचेस्टर : रोमेलू लूकाकूने नोंदवलेल्या गोलच्या बळावर मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबाल स्पर्धेमधील सामन्यात तुल्यबळ चेल्सीचा २-१ ने पराभव केला. गेल्या काही सिझनमध्ये लूकाकू प्रीमियर लीगमधील दिग्गज संघांसमोर अपयशी ठरत असल्याने सातत्याने त्याच्यावर टीका होत होती. गेल्या सहा सामन्यात त्याची पाटी कोरीच राहिली आहे. त्यामुळे त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते.
मात्र, चेल्सीविरुद्धच्या सामन्यात महत्त्वपूर्ण गोल करून त्याने टीकाकारांना योग्य उत्तर दिले आहे. चेल्सीच्या विलियम्सने सामना सुरू झाल्यानंतर अर्ध्यातासातच गोल करून आघाडी घेतली होती. यावेळी मँचेस्टर युनायटेडला पराभवाचा धक्का बसणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.
मात्र, आक्रमक पवित्रा घेतलेल्या युनायटेडने चेल्सीला जोरदार टक्कर दिली. लूकाकूने ३९ व्या मिनटाला गोल करून युनायटेडला महत्त्वपूर्ण बरोबरी साधून दिली. त्याचप्रमाणे निर्णायक गोल करण्यासाठीही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. लुकाकूने केलेल्या शानदार क्रॉसवर जेसी लिगार्डने निर्णायक गोल करून मँचेस्टर युनायटेडचा शानदार विजय साजरा केला. (वृत्तसंस्था)

Web Title: EPL: Chelsea defeat by Manchester United, crucial game of Romelu Lukaku