शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

इंग्लंड-अमेरिका रंगतदार लढतीची अपेक्षा, फिफा अंडर-१७ फुटबॉल विश्वकप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 02:05 IST

फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत शनिवारी इंग्लंड आणि अमेरिका यांच्यादरम्यान खेळल्या जाणारी लढत रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. हे दोन्ही संघ वयोगटातील स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक आहे.

मडगांव : फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत शनिवारी इंग्लंड आणि अमेरिका यांच्यादरम्यान खेळल्या जाणारी लढत रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. हे दोन्ही संघ वयोगटातील स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक आहे. कारण स्पर्धेसाठी पात्रता मिळवल्यानंतरही आतापर्यंत उभय संघांना जेतेपद पटकावता आलेले नाही.अमेरिका संघाची अंडर-१७ विश्वकप स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी १९९९ मध्ये झाली आहे. त्यावेळी त्यांनी चौथे स्थान पटकावले होते. इंग्लंडने एक दशकापूर्वी या स्पर्धेत पदार्पण केले होते आणि आता चौथ्यांदा स्पर्धेत सहभागी होत आहे. २००७ मध्ये या संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी त्यांना जर्मनीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. मॅक्सिकोमध्ये २०११ मध्ये जर्मनीने पुन्हा एकदा इंग्लंडला गाशा गुंडाळण्यास भाग पाडले होते तर २०१५ मध्ये चिलीमध्ये इंग्लंड संघ बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरला होता. आता यापूर्वीच्या संघातील खेळाडू डॅनी वेलबेक व रहीम स्टर्लिंग सीनिअर पातळीवर खेळत आहेत तर स्टार स्ट्रायकर जेडन सांचो आपला क्लब बोरुसिया डोर्टमंडतर्फे खेळण्यासाठी गेला आहे. या स्टार खेळाडूंविनाही इंग्लंड संघात आगेकूच करण्याची क्षमता आहे. इंग्लंड संघासाठी दिलासा देणारी बाब म्हणजे हा संघ अखेर पेनल्टी शूटआऊटचे दुष्टचक्र भेदण्यात यशस्वी ठरला आहे. गोलकीपर कुर्टिस एंडरसनने दडपणाखाली चांगला बचाव केला. त्यामुळे इंग्लंड संघाला जपानविरुद्ध विजय मिळवण्यात यश आले. त्या लढतीत इंग्लंडने ५-३ ने सरशी साधली. जपानविरुद्ध प्री क्वॉर्टरफायनलमध्ये सांचोचे स्थान घेणारा एंजेल गोम्सला कॅलम हडसन ओहोई व फिलिप फोडेन यांच्यासह मधल्या फळीत चांगली कामगिरी करावी लागेल. अमेरिकेच्या आघाडीच्या फळीतील त्रिमूर्ती जोस सार्जेंट, टीम व्हीयाह व आयो अकिनोला इंग्लंडच्या बचावफळीपुढे अडचणी निर्माण करू शकतात. पॅराग्वेविरुद्ध हॅट््ट्रिक नोंदविल्यामुळे व्हीयाहचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. आक्रमणाबाबत चर्चा करताना अमेरिकन संघ वेगवान आहे. त्यामुळे इंग्लंडची बचाव फळी टीमोथी, इयोमा, जोएल लॅटिबियुडियरे, मार्क गुएई आणि जोनाथन पँजो यांचा कस लागणार आहे. (वृत्तसंस्था)सामना : भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017FootballफुटबॉलSportsक्रीडा