दिएगो मॅराडोना दारू पिऊन गाडीच्या छतावर बसतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 12:58 IST2018-09-05T12:58:30+5:302018-09-05T12:58:48+5:30
रशियात नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनो यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत होती. पुन्हा एकदा मॅराडोना चर्चेत आले आहेत.

दिएगो मॅराडोना दारू पिऊन गाडीच्या छतावर बसतात तेव्हा...
माद्रिद - रशियात नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनो यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत होती. पुन्हा एकदा मॅराडोना चर्चेत आले आहेत. यावेळी तर दारू पिऊन घातलेल्या धिंगाण्यामुळे त्यांची चर्चा आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेले मॅराडोना गाडीच्या छतावर बसून आक्षेपार्ह वर्तणूक करत होते. तसा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाच्या प्रत्येक सामन्याला मॅराडोना जातीने हजर राहत होते. स्टेडियमवरील त्यांची वागणूकीने अनेकांना चर्चेचे मुद्दे दिले. लिओनेल मेस्सीने गोल केल्यानंतर त्यांनी दाखवलेले मधले बोट असो किंवा स्टेडियमवर त्यांचा डान्स, मॅराडोना हे नेहमीच आक्षेपार्ह वर्तणूकीमुळे टीकेचे धनी झाले आहेत.