शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

रोनाल्डोच्या मदकार्याच्या चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 4:07 AM

पोतुर्गालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपली सगळी हॉटेल्स रुग्णालयात बदलण्याचा निर्णय घेत रुग्णांच्या उपचाराचा खर्चही करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र...

नवी दिल्ली - करोना आजाराशी लढण्यासाठी जगभरातील क्रीडा क्षेत्र एकवटले आहे. त्यात पोतुर्गालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपली सगळी हॉटेल्स रुग्णालयात बदलण्याचा निर्णय घेत रुग्णांच्या उपचाराचा खर्चही करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या.पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डोने या रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार केले जातील असे सांगितले. दिवसभर रोनाल्डोच्या या निर्णयाचे वृत्त कोरोना विषाणूपेक्षाही अधिक वेगाने जगभरात पसरले. डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांचा खर्चही रोनाल्डो करणार असल्याचे वृत्त जगभरातील प्रसारमाध्यंमांनी दिले. मात्र काही तासांनीच हे वृत्त खोटे असल्याचे एका इंग्रजी वृत्तसंकेस्थळाने म्हटले. त्यामुळे रोनाल्डोच्या मदतकार्याच्या चर्चांना उधाण आले. क्रीडा पत्रकार क्रिस्तोफ टेररने रोनाल्डो मोफत उपचार करणार असल्याचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केल्यानंतर रोनाल्डोच्या मदतीची सर्वप्रथम बातमी देणारे मार्का वृत्तपत्र व युवेंटसच्या संकेस्थळाने ही बातमी मागे घेतली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Footballफुटबॉलcorona virusकोरोना