Fifa World Cup, Poland : अर्जेंटिनाने पराभूत करूनही पोलंड बाद फेरीत; जाणून घ्या ३६ वर्षांनी कसा करिष्मा घडला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 08:26 AM2022-12-01T08:26:02+5:302022-12-01T08:26:22+5:30

Fifa World Cup, Poland : लिओनेल मेस्सी की लेव्हांडोवस्की यांच्यापैकी कोण बाद फेरीत जातं याची उत्सुकता साऱ्याच फुटबॉलप्रेमींना होती.

Despite their defeat against Argentina, Poland qualified from the group stage of a World Cup tournament for the first time since 1986 | Fifa World Cup, Poland : अर्जेंटिनाने पराभूत करूनही पोलंड बाद फेरीत; जाणून घ्या ३६ वर्षांनी कसा करिष्मा घडला

Fifa World Cup, Poland : अर्जेंटिनाने पराभूत करूनही पोलंड बाद फेरीत; जाणून घ्या ३६ वर्षांनी कसा करिष्मा घडला

Next

Fifa World Cup, Poland : लिओनेल मेस्सी की लेव्हांडोवस्की यांच्यापैकी कोण बाद फेरीत जातं याची उत्सुकता साऱ्याच फुटबॉलप्रेमींना होती. दोन्ही खेळाडू आपापल्या देशाचे स्टार आहेत आणि त्यामुळे अर्जेंटिना विरुद्ध पोलंड सामना पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक स्टेडियमवर होतेच, शिवाय  टेलिव्हिजनचेही रेकॉर्ड मोडले गेले. पहिल्या हाफमध्ये पोलंडने दिलेली झुंज पाहून अर्जेंटिनाचे चाहते तणावात होते, परंतु दुसऱ्या हाफमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. अर्जेंटिनाने अखेरीस हा सामना २-० ने जिंकला, परंतु दोन्ही संघाचे चाहते आनंदी होते. कारण, पराभूत होऊनही पोलंडने बाद फेरीत प्रवेश पटकावला होता. १९८६नंतर प्रथमच पोलंड ते बाद फेरीत खेळणार आहेत. यापूर्वी २००२, २००६ आणि २०१८मध्ये त्यांना अपयश आले होते. 

मेस्सी ठरला फेल, रोमहर्षक विजयासह अर्जेंटिनाची Round 16 मध्ये एन्ट्री! पोलंडने झुंजवले


पहिल्या हाफमध्ये ६६ टक्के काळ चेंडूवर ताबा, ३२० पासेस आणि ७ ऑन टार्गेट मारूनही अर्जेंटिनाची पहिल्या हाफमध्ये पाटी पोलंडचा गोलरक्षक सिजेसनीने कोरीच राहू दिली. दुसऱ्या हाफमध्ये अर्जेंटिनाने धडाकेबाज सुरुवात केली आणि दुसऱ्याच मिनिटाला (४६ मि.) मॅक एलिस्टरने मोनिलाच्या पासवर अप्रतिम गोल केला. #Argentina ने १-० अशी आघाडी घेतली. ६१ व्या मिनिटाला एलिस्टरने आघाडी डबल केली असती, परंतु यावेळी चेंडू पोलंडच्या गोलीच्या हाती सहज विसावला.  मेस्सीला गोल करण्यात अपयश येत असताना अर्जेंटिनाचे अन्य खेळाडू सुसाट सुटले... ६७ व्या मिनिटाला अलव्हारेजने पोलंडला ०-२ असे बॅकफूटवर फेकले आणि विजयाची नोंद करून बाद फेरीत प्रवेश केला. 

याच गटातील दुसरी निर्णायक लढत सौदी अरेबिया विरुद्ध मेक्सिको अशी सुरू होती. सौदी अरेबियाने पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाला धक्का दिला होता आणि तेही बाद फेरीच्या शर्यतीत होते. त्यांनी हा लढत जिंकला असता तर पोलंड बाहेर फेकले गेले असते, परंतु मेक्सिकोने २-१ असा विजय मिळवून पोलंडचा मार्ग सोपा केला . मेक्सिको व पोलंड यांचे प्रत्येकी ४ गुण असले तरी गोल डिफरन्समध्ये पोलंडने वर्चस्व राखल्याने त्यांचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित झाला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Despite their defeat against Argentina, Poland qualified from the group stage of a World Cup tournament for the first time since 1986

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.