युव्हेंटसच्या जर्सीत रोनाल्डोचा पहिला गोल; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 08:52 AM2018-08-13T08:52:06+5:302018-08-13T08:52:42+5:30

मागील १५ वर्ष मँचेस्टर युनायटेड आणि रेयाल माद्रिदकडून गोल्सचा पाऊस पाडणाऱ्या ख्रिस्तीयानो रोनाल्डोने सोमवारी आपल्या नवीन क्लबकडून पहिला गोल नोंदवला.

Cristiano Ronaldo's first goal in the new jersey; Watch video | युव्हेंटसच्या जर्सीत रोनाल्डोचा पहिला गोल; पाहा व्हिडीओ

युव्हेंटसच्या जर्सीत रोनाल्डोचा पहिला गोल; पाहा व्हिडीओ

googlenewsNext

मुंबई- मागील १५ वर्ष मँचेस्टर युनायटेड आणि रेयाल माद्रिदकडून गोल्सचा पाऊस पाडणाऱ्या ख्रिस्तीयानो रोनाल्डोने सोमवारी आपल्या नवीन क्लबकडून पहिला गोल नोंदवला. युव्हेंटसच्या जर्सीत प्रथमच मैदानावर उतरलेल्या रोनाल्डोने तुरीन येथील ओल्ड लेडी मैदानावर व्हिल्लर पेरोसा 'ब' क्लबविरुद्ध सुरेख गोल केला. नव्या सहकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष सामन्यात खेळण्याचा सराव व्हाव म्हणून रोनाल्डो  मैदानात उतरला होता. 

पदार्पणाच्या लढतीत रोनाल्डोला गोल करण्यासाठी केवळ आठ मिनिटाचा खेळ पुरेसा ठरला. मागील महिन्यात सीरि ए लीगच्यी विजेत्या युव्हेंटसने त्याला ८०० कोटी रुपयांत करारबद्ध केले. रेयालसोबतचा नऊ वर्षांचा प्रवास सोडून रोनाल्डो युव्हेंटसमध्ये दाखल झाला. रेयालच्या इतिहासात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम रोनाल्डोच्या नावावर आहे. युव्हेंटसकडून रोनाल्डोने केलेला पहिला गोल पाहा..



'सर्वकाही चांगले सुरू आहे. गोल केल्याचा आनंद आहेच. येथील चाहत्यांचा पाठिंबा पाहून मी थक्क झालो. मी लहान असल्यापासून या क्लबला फॉलो करतोय. तेव्हा या क्लबकडून खेळण्याचे पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरले आहे. जगातील मोठ्या क्लबकडून खेळण्याचा आनंदच निराळा आहे,'अशी प्रतिक्रिया रोनाल्डोने दिली. 
 

Web Title: Cristiano Ronaldo's first goal in the new jersey; Watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.