शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
4
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
5
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
6
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
7
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
8
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
9
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
10
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
11
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
12
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
13
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
14
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!
15
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
16
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
17
Saif Ali Khan : "तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
18
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
19
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
20
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप

ख्रिस्तियानो रोनाल्डोने युव्हेंटच्या 61 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी केली बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 15:40 IST

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने रविवारी युव्हेंटस क्लबकडून विक्रमी गोल केला.

ठळक मुद्देख्रिस्तियानो रोनाल्डोने रविवारी युव्हेंटस क्लबकडून विक्रमी गोल केला.युव्हेंटसने सीरि A स्पर्धेत फिओरेंटीनावर 3-0 असा विजय मिळवत रोनाल्डोने 14 सामन्यांत 10 गोल करताना नोंदवला विक्रम

माद्रिदः जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने रविवारी युव्हेंटस क्लबकडून विक्रमी गोल केला. युव्हेंटस क्लबने रविवारी सीरि A स्पर्धेत फिओरेंटीना क्लबवर 3-0 असा विजय मिळवत जेतेपदाच्या दिशेने 11 गुणांची मोठी आघाडी घेतली. या सामन्यात रोनाल्डोने 79व्या मिनिटाला गोल करत विक्रमी कामगिरी केली. 61 वर्षांपूर्वी दिग्गज फुटबॉलपटून जॉन चार्लेस यांनी नोंदवलेल्या विक्रमाशी बरोबरी केली.

रेयाल माद्रिद क्लबच्या माजी खेळाडूला युव्हेंटसकडून सुरुवातीला दर्जेदार खेळ करण्यात अडचण येत होती. मात्र, त्याने लय मिळवत गोल धडाका लावला. रोनाल्डोने युव्हेंटसकडून सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये 13 सामन्यांत 9 गोल केले होते. सीरि A स्पर्धेत जीओनाच्या किर्झीस्तोफ पिएटेक याच्यानंतर सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोनाल्डो दुसऱ्या स्थानी होता. रविवारच्या सामन्यात रोनाल्डोने एक गोल केला आणि त्याच्या नावावर 14 सामन्यांत 10 गोल झाले आहेत. युव्हेंटसनेही 14 सामन्यांत 40 गुणांसह जेतेपद कायम राखण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे.युव्हेंटसकडून 14 सामन्यांत 10 गोल करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. 1957 साली चार्लेस यांनी 14 सामन्यांत गोल्सचा दुहेरी आकडा गाठला होता. या कामगिरीमुळे रोनाल्डोची गोल करण्याची भुक अद्याप संपलेली नसल्याची प्रचिती येते. युव्हेंटसच्या या सामन्यातर रॉड्रीगो बेंटांक्यूर (31 मि.) आणि जिओर्जिओ चिएलीनी ( 69 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. 79व्या मिनिटाला युव्हेंटसला पेनल्टी देण्यात आली आणि त्यावर रोनाल्डोने गोल केला.   

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डो