शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

Cristiano Ronaldo: रोनाल्डो मालामाल! सौदीच्या क्लबसोबत करार; वर्षाचा पगार बघाल तर हादराल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 11:26 AM

रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यातील बेबनावामुळे ऐन वर्ल्डकप सुरु असतानाच दोघांनी करार संपविला होता. यानंतर रोनाल्डोच्या भविष्याबाबत अनेक प्रकारची शक्यता वर्तविण्यात येत होती. रोनाल्डो निवृत्ती घेईल असेही बोलले जात होते, त्यावर आता पूर्णविराम लागला आहे. 

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तायानो रोनाल्डो झटक्यात मालामाल बनला आहे. त्याने सौदी अरेबियाच्या अल नस्सरसोबत अडीज वर्षांचा करार केला आहे. याचबरोबर तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. युरोपमध्ये अनेक वर्षे खेळल्यानंतर रोनाल्डो आता आशियाई क्लबकडून खेळणार आहे. 

रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यातील बेबनावामुळे ऐन वर्ल्डकप सुरु असतानाच दोघांनी करार संपविला होता. यानंतर रोनाल्डोच्या भविष्याबाबत अनेक प्रकारची शक्यता वर्तविण्यात येत होती. रोनाल्डो निवृत्ती घेईल असेही बोलले जात होते, त्यावर आता पूर्णविराम लागला आहे. 

३७ वर्षीय रोनाल्डोने २०२५ पर्यंत अल नस्सरसोबत करार केला आहे. यासाठी त्याला 200 मिलियन यूरो (1775 करोड़ रुपये) मिळणार आहेत. फुटबॉल क्लब अल नस्सरने याची माहिती दिली आहे. रोनाल्डोच्या समावेशामुळे अल नस्सरचा संघ मजबूत होईल. क्लबने नऊ सौदी प्रो लीग विजेतेपदे जिंकली आहेत. या संघाला आता प्रथमच एएफसी चॅम्पियन्स लीग जिंकण्याची आशा असेल."युरोपियन फुटबॉलमध्ये जे काही मिळविण्याचे मी ठरवले होते ते सर्व मी जिंकले आहे, त्यासाठी भाग्यवान आहे. आता मला वाटते की आशियातील माझा अनुभव शेअर करण्याची हीच योग्य वेळ आहे'', असे रोनाल्डोने म्हटले आहे. 

रोनाल्डोने 2009-18 पासून स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदसोबत उत्कृष्ट खेळ केला. या काळात त्याने दोन ला लीगा, दोन स्पॅनिश चषक, चार चॅम्पियन्स लीग विजेतेपद आणि तीन क्लब विश्वचषक जिंकले आहेत. रोनाल्डोने क्लब आणि देशासाठी एकूण 800 हून अधिक गोल केले आहेत. रोनाल्डोने युव्हेंटसमध्ये तीन वर्षात दोन सेरी ए जेतेपद आणि एक कोपा इटालिया ट्रॉफीही जिंकली. 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोsaudi arabiaसौदी अरेबियाFootballफुटबॉल