Shocking: इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्याची कोरोनाशी झुंज अपयशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 05:11 PM2020-04-17T17:11:38+5:302020-04-17T17:12:31+5:30

गेल्या आठवड्यात त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते...

Corona Virus : Leeds United legend Norman Hunter dies at 76 after contracting Covid-19 svg | Shocking: इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्याची कोरोनाशी झुंज अपयशी 

Shocking: इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्याची कोरोनाशी झुंज अपयशी 

Next

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 21 लाख 82,823 इतकी झाली असून 1 लाख 45,551 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पण, दिलासादायक बाब म्हणजे 5 लाख 47,679 लोकं बरी झाली आहेत. कोरोना व्हायरसची झळ क्रीडा क्षेत्रालाही बसली आहे. इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या फुटबॉल संघाचे सदस्य आणि लिड्स युनायटेड क्लबचे दिग्गज फुटबॉलपटू नॉर्मन हंटर यांचे शुक्रवारी कोरोना व्हायरसमुळे निधन झाले. ते 76 वर्षांचे होते.  

''गेल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना वाचवण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु आज सकाळी त्यांचे निधन झाले,'' असे लिड्स क्लबने सांगितले.





नॉर्मन हे वर्ल्ड कप विजेत्या संघाचे सदस्य होते, परंतु त्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी लीड्स क्लबला दोन जेतेपद पटकावून दिली होती. 29 ऑक्टोबर 1943 मध्ये त्यांचा जन्म झाला. लीड्स क्लबसाठी त्यांनी 726 सामने खेळे आणि त्यात त्यांनी 21 गोल केले. 1962 ते 1976 या कालावधीत ते लीड्स साठी खेळले. त्यानंतर 1976 ते 1979 या कालावधीत ब्रिस्टल सिटी आणि 1979 ते 1982 या कालावधीत बर्न्सले क्लबचे प्रतिनिधित्व केले. 

नॉर्मन यांनी 1964 ते 1965 कालावधीत इंग्लंडच्या 23 वर्षांखालील आणि 1965 ते 1974 या कालावधीत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले. खेळाडू म्हणून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्यांनी 1980 ते 1990 मध्ये ते संघाचे व्यवस्थापक होते.  

Read in English

Web Title: Corona Virus : Leeds United legend Norman Hunter dies at 76 after contracting Covid-19 svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.