'City Football Group' Bought Mumbai FC club | ‘सिटी फुटबॉल ग्रुप’चे मुंबई एफसी क्लबवर वर्चस्व
‘सिटी फुटबॉल ग्रुप’चे मुंबई एफसी क्लबवर वर्चस्व

मुंबई : युरोपियन क्लब फुटबॉलमधील मातब्बर संघ असलेल्या मँचेस्टर सिटीच्या सिटी फुटबॉल ग्रुपने (सीएफजी) इंडियन सुपर लीगमधील मुंबई एफसी संघाचे ६५ टक्के शेअर्स विकत घेतले. गुरुवारी याबाबतची अधिकृत घोषणा सीएफजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फेरान सोरियानो आणि फुटबॉल स्पोटर््स डेव्हलपमेंट लिमिटेडच्या (एफएसडीएल) प्रमुख नीता अंबानी यांनी मुंबईत केली.

या महत्त्वपूर्ण करारामुळे मुंबई एफसी फुटबॉल संघाला सीएफजीच्या व्यावसायिक आणि फुटबॉल विश्वातील माहितीचा फायदा होईल. त्याचबरोबर सीएफजीच्या जागतिक व्यासपीठावर पोहोचण्याचीही मुंबई एफसीला संधी मिळेल. या वेळी नीता अंबानी यांनी म्हटले, ‘हा ऐतिहासिक क्षण असून भारतीय फुटबॉलने गाठलेल्या यशाचा मला अभिमान आहे.

या करारामुळे मुंबई एफसी ब भारतीय फुटबॉलला मोठा फायदा होईल अशी खात्री आहे.’ करारानुसार मुंबई एफसीमधील ६५ टक्के शेअर्स सीएफजीकडे, तर ३५ टक्के शेअर्स अभिनेता रणबीर कपूर व बिमल पारेख या संघ मालकांकडे असतील. त्याचप्रमाणे मँचेस्टर सिटी क्लब संघाने ट्विटरवरून आनंद व्यक्त करतानाच मुंबई सिटी एफसीचे आपल्या परिवारात स्वागतही केले.

Web Title: 'City Football Group' Bought Mumbai FC club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.