चीनकडून अंगावर ‘टॅटू’ असणाऱ्या फुटबॉलपटूंवर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 08:49 IST2022-01-01T08:49:19+5:302022-01-01T08:49:40+5:30
China : चीनच्या या अजब निर्णयामुळे अनेक जण बुचकळ्यात पडले आहेत. मात्र संघात स्थान हवे असेल तर चीन सरकारच्या या फतव्याचे पालन करणे खेळाडूंना अपरिहार्य असणार आहे.

चीनकडून अंगावर ‘टॅटू’ असणाऱ्या फुटबॉलपटूंवर बंदी
बीजिंग : चीनच्या क्रीडा व्यवस्थापनाकडून एक अजब निर्णय घेण्यात आला आहे. ज्या फुटबॉलपटूच्या शरीरावर टॅटू काढलेला असेल त्यांना राष्ट्रीय संघात स्थान दिले जाणार नाही. तसेच खेळाडूंना जर संघात सामील व्हायचे असेल तर त्यांना अंगावर असलेला टॅटू काढून टाकावा लागणार आहे.
समाजात एक योग्य संदेेश जावा यासाठी हा निर्णय घेतल्याचे चीनच्या सरकारी यंत्रणेकडून सांगण्यात आले. चीनच्या या अजब निर्णयामुळे अनेक जण बुचकळ्यात पडले आहेत. मात्र संघात स्थान हवे असेल तर चीन सरकारच्या या फतव्याचे पालन करणे खेळाडूंना अपरिहार्य असणार आहे.