शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

गोल्डन बुटवर केनचा दावा मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 4:25 AM

विश्वकप फुटबॉल स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात असून इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन गोल्डन बुटच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर आहे, पण बेल्जियमचा रोमेलू लुकाकू पुढील दोन सामन्यात चमकदार कामगिरी करीत या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा मानकरी ठरू शकतो.

नवी दिल्ली  - विश्वकप फुटबॉल स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात असून इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन गोल्डन बुटच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर आहे, पण बेल्जियमचा रोमेलू लुकाकू पुढील दोन सामन्यात चमकदार कामगिरी करीत या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा मानकरी ठरू शकतो.विश्वकप स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदवणारा खेळाडू गोल्डन बुट पुरस्काराचा मानकरी ठरतो. हेरी केनने आतापर्यंत सहा गोल नोंदवले आहे तर त्याचा जवळचा प्रतिस्पर्धी लुकाकूच्या नावावर चार गोलची नोंद आहे. या दोन्ही खेळाडूंना आता दोन-दोन सामने खेळण्याची संधी मिळेल. अशा स्थितीत उपांत्य फेरीच्या लढतीदरम्यान संघाच्या कामगिरीव्यतिरिक्त केन व लुकाकू यांच्या कामगिरीवर नजर राहील.रशियाचा डेनिस चेरिसेव व पोर्तुगालाचा ख्रिस्टियानो रोनाल्डो यांनीही या स्पर्धेत प्रत्येकी चार गोल नोंदवले, पण त्यांचे संघ स्पर्धेबाहेर फेकले गेले आहेत. या व्यतिरिक्त सहा खेळाडूंनी प्रत्येकी तीन गोल नोंदवले आहेत. त्यात फ्रान्सचा काइलियान एमबापे व मंटोनी ग्रीजमॅन यांचा समावेश आहे. फ्रान्स ज्यावेळी १० जुलै रोजी उपांत्य फेरीत बेल्जियमसोबत खेळेल त्यावेळी लुकाकू व्यतिरिक्त या दोन्ही खेळाडूंना गोल्डन बुटच्या जवळ जाण्याची संधी राहील. त्यामुळे आता या तिघांच्या खेळाची उत्सुकता लागली आहे.गोल्डन बुटसाठी सध्या केनचा दावा अधिक मजबूत आहे. इंग्लंड ११ जुलै रोजी क्रोएशियाविरुद्ध दुसऱ्या उपांत्य लढतीत खेळेल. त्यावेळी केनला या लढतीत स्कोअर नोंदवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा गोल नोंदवण्याच्या शर्यतीत मोठी आघाडी घेण्याची संधी राहील. जर केन गोल्डन बुटचा मानकरी ठरला तरइंग्लंडचा खेळाडू दुसºयांदा या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा मान मिळवेल. यापूर्वी १९८६ मध्ये मेक्सिकोमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वकप स्पर्धेत गॅरी लिनाकरने सर्वाधिक सहा गोल नोंदवत गोल्डन बुट (त्यावेळी गोल्डन शू) पटकावला होता.बेल्जियमच्या एकाही खेळाडूला अद्याप गोल्डन बुट मिळवता आलेला नाही आणि जर लुकाकूने जर हा मान मिळवला तर अशी कामगिरी करणारा तो देशाचा पहिला खेळाडू ठरेल.फ्रान्स संघाबाबत विचार करात दिग्गज फुटबॉलपटू जस्ट फोंटेनने १९५८ स्वीडन विश्वकप स्पर्धेत १३ गोल नोंदवण्याचा विक्रम करीत गोल्डन बुट पटकावला होता. कुठल्या एका विश्वकप स्पर्धेत हा गोल नोंदवण्याचा हा विक्रम अद्याप अबाधित आहे.क्रोएशियाचे स्वप्न कायमजगरेब : क्रोएशिया मीडियाने विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात यजमान रशियाला पेनल्टीत नाट्यमय विजय नोंदविल्यानंतर आपल्या संघाची प्रशंसा केली आहे. क्रोएशियाचा संघ उपांत्य फेरीत इंग्लंडशी दोन हात करील.‘स्पोर्टसके नोवोस्ती’ या वर्तमानपत्राने लिहिले, ‘मास्को, क्रोएशिया संघ सज्ज आहे. प्रिय इंग्लंड, पुन्हा तुमच्याशी खेळणे शानदार आहे.’ या वर्तमानपत्राने १९८८ च्या महान संघाच्या यशाचे स्मरण करीत लिहिले, ‘क्रोएशियाचे स्वप्न जिवंत आहे.’ १९९८ मध्ये क्रोएशियाचा स्वतंत्र देश म्हणून ही पहिली विश्वचषक स्पर्धा होती आणि त्यात त्यांनी उपांत्य फेरीत धडक मारली होती. इंग्लंडने २00९ मध्ये विश्वचषक क्वॉलिफायरमध्ये क्रोएशियाचा ५-१ असा पराभव केला होता. त्यानंतर गत वर्षी क्रोएशियाला इंग्लंडविरुद्ध १-४ असा पराभवाचा सामना करावा लागला होता. या वर्तमानपत्राने लिहिले, ‘२0 वर्षांनंतर आम्ही उपांत्य फेरीत पोहोचलो आहोत. इंग्लंडविरुद्ध आम्हाला २00९ चा काही हिशेब चुकता करायचा आहे.’ जुटारनजी लिस्टने पहिल्या पानावर लिहिले, ‘क्रोएशिया पराभव मानू नका.’ या वर्तमानपत्राने इव्हान राकितिचचे मोठे छायाचित्रही लावले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉल