शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

होंडुरासविरुद्ध ब्राझीलचे पारडे जड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 04:44 IST

गटसाखळीतील सर्व सामने सहज जिंकणा-या दक्षिण अमेरिकेतील दिग्गज संघ ब्राझीलला बुधवारी फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत होंडुरासच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

कोची : गटसाखळीतील सर्व सामने सहज जिंकणा-या दक्षिण अमेरिकेतील दिग्गज संघ ब्राझीलला बुधवारी फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत होंडुरासच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या लढतीत ब्राझीलचे पारडे जड राहण्याची शक्यता आहे.चौथ्यांदा जेतेपद पटकावण्याच्या दिशेने वाटचाल करणाºया ब्राझीलने ‘ड’ गटात सर्व सामने जिंकले आहेत. त्यांनी पहिल्या लढतीत स्पेनचा २-१ ने पराभव केला, तर त्यानंतर उत्तर कोरिया व नायजेरविरुद्ध २-० ने विजय मिळवला. ब्राझीलला तीन सामन्यांत केवळ एक गोल खावा लागला, तर त्यांनी सहा गोल नोंदवले. स्ट्रायकर लिंकन व पोलिन्हो या जोडीची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्यामुळे ब्राझीलला विनिशियस ज्युनिअरची उणीव भासली नाही. या दोघांनी एकूण पाच गोल नोंदवले, तर ब्रेनेरने एक गोल केला. कोचीचे फुटबॉल चाहते या लढतीत ब्राझीलचे समर्थन करतील. त्यामुळे होंडुराससाठी ही लढत आणखी खडतर होईल. या फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत ब्राझीलची कोचीमधील ही अखेरची लढत आहे. ब्राझील उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी ठरला तर त्यांना रविवारी (दि. २२) कोलकातामध्ये जर्मनीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.आफ्रिकी संघांच्या लढतीमध्ये घानाचा सामना नायजरसोबतनवी मुंबई : दोनदा जेतेपदाचा मान मिळवणाºया घाना संघाला फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांच्या उपखंडातील शेजारी नायजरच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. घानाने १९९१ व १९९५ मध्ये जेतेपद पटकावले होते व नव्वदच्या दशकात पाचपैकी चार वेळा अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर मात्र त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. नायजर संघ धक्कादायक निकाल नोंदवण्यास सक्षम असल्याची घानाला कल्पना आहे. त्यांनी पाच वेळा जेतेपद पटकावणाºया नायजेरियाचा विभागीय स्पर्धेत पराभव करीत या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.नायजेरला ‘ड’ गटात यूरो चॅम्पियन स्पेनने ४-० ने पराभूत केले, तर दक्षिण अमेरिकी चॅम्पियन ब्राझीलकडून त्यांना २-० ने पराभव स्वीकारावा लागला.नायजरने उत्तर कोरियाचा १-० ने पराभव करीत अंतिम १६ संघांत स्थान मिळवले. दुसºया बाजूचा विचार करता घानाने कॅमेरुनचा ४-० ने आणि गाबोनचा ५-० ने पराभव करीत स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.त्यांनी गिनियाविरुद्धची लढत गोलशून्यने अनिर्णीत राखली, तर नायजरविरुद्ध पेनल्टीमध्ये सरशी साधली, तर मालीविरुद्ध ०-१ ने पराभव स्वीकारला. 

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017FootballफुटबॉलSportsक्रीडा