डेम्बलेच्या दोन गोलने बार्सिलोना विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:25 IST2018-05-11T00:25:46+5:302018-05-11T00:25:46+5:30

ओसमेन डेम्बेले याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने विलारीयालला ५-१ ने पराभूत करत ला लीगामध्ये आपल्या पहिल्या अपराजित मोसमाच्या दिशेन भक्कम वाटचाल केली.

Barcelona win News | डेम्बलेच्या दोन गोलने बार्सिलोना विजयी

डेम्बलेच्या दोन गोलने बार्सिलोना विजयी

बार्सिलोना - ओसमेन डेम्बेले याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने विलारीयालला ५-१ ने पराभूत करत ला लीगामध्ये आपल्या पहिल्या अपराजित मोसमाच्या दिशेन भक्कम वाटचाल केली.
रियाल माद्रिदला फेब्रुवारीनंतर लीगमध्ये आपला पहिला पराभव पत्करावा लागला. त्यावेळी सेविलाने त्यांना ३-२ अशी मात दिली. फिलीप कोटिन्हो व पोलिन्हो यांनी पहिल्या १६ मिनिटात दोन गोल करत कॅम्प नाऊमध्ये बार्सिलोनाला २ -० असे पुढे नेले. लियोनेल मेस्सी याने पहिल्या सत्राच्याआधी एक गोल करत संघाला ३ -० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सत्राध्ये डेम्बले याने दोन गोल केले. विलारीयाल कडून एकमेव गोल निकोल सेनसोन याने केला. या विजयासोबत बार्सिलोनाच्या संघाने दुसºया स्थानावरील एटलेटिको माद्रिदवर १५ गुणांनी आघाडी घेतली आहे. विलारीयाल सहाव्या स्थानावर आहे.

Web Title: Barcelona win News