शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बार्सिलोना क्लब सरावाला लागला, पण मेस्सीशिवाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 10:03 AM

ला लिगा या स्पॅनिश लीगमधील यशस्वी क्लब बार्सिलोनानेही आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स कप स्पर्धेसाठी कसून सरावाला सुरूवात केली, परंतु कॅम्प न्यू येथे सराव करत असलेल्या बार्सिलोनाच्या खेळाडूंमध्ये लिओनेल मेस्सी कुठेच दिसत नाही. 

माद्रिद - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर क्लब स्पर्धांची जत्रा फुटबॉल शौकिनांसाठी भरणार आहे. त्यामुळे प्रत्येक क्लब तयारीला लागले आहेत. ला लिगा या स्पॅनिश लीगमधील यशस्वी क्लब बार्सिलोनानेही आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स कप स्पर्धेसाठी कसून सरावाला सुरूवात केली, परंतु कॅम्प न्यू येथे सराव करत असलेल्या बार्सिलोनाच्या खेळाडूंमध्ये लिओनेल मेस्सी कुठेच दिसत नाही. बार्सिलोनाचे प्रशिक्षक एर्नेस्टो व्हॅलव्हेर्डे यांनी आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात मेस्सीला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे तो सरावासाठीही हजर नव्हता. मेस्सीसह विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेले अनेक खेळाडू अमेरिकेत होणा-या या स्पर्धेत खेळणार नाहीत. बार्सिलोनाने नव्याने करारबद्ध केलेले ऑर्थर मेलो आणि क्लेमेंट लेंग्लेट यांना आपली छाप पाडण्याची आवश्यकता आहे. लुईस सुआरेझ, फिलिप कुटीन्यो, जिरार्ड पिक्यू, सेर्गियो बुस्क्यूट आणि जॉर्डी अल्बा यांच्यासह सॅम्युयल उम्टीटी, ओस्मान डेम्बेले आणि इव्हान रॅकिटीच हे विश्वचषक स्पर्धेतील फायनलीस्टही चॅम्पियन्स कपसाठी बार्सिलोनासोबत जाणार नाहीत. ऑगस्ट महिन्यापर्यंत हे खेळाडू सुट्टीवर आहेत. जर्मनीचा गोलरक्षक मार्क-आंद्रे टेर स्टीगन हा क्लबसोबत असणार आहे. बार्सिलोना क्लब मंगळवारी पोर्टलँडसाठी रवाना होणार आहे. तेथे ते नाइके हेडक्वाटर्स येथे सराव करतील आणि शनिवारी लॉस अँजिलीससाठी रवाना होणार आहेत.   

टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सीFootballफुटबॉलSportsक्रीडा