... अन् पेले यांचे चाहते भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 19:40 IST2018-06-04T19:40:49+5:302018-06-04T19:40:49+5:30
फिफाने फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूची निवड करण्यासाठी ऑनलाईन मतदान घेतले होते. या मतदानानंतर जो काही निकाल आला तो पाहून ब्राझीलचे माजी महान फुटबॉलपटू पेले यांचे चाहते चांगलेच भडकले आहेत.

... अन् पेले यांचे चाहते भडकले
मॉस्को : फुटबॉल विश्वचषक येत्या काहि दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला फिला या संघटनेकडून बऱ्याच गोष्टी सुरु आहेत. फिफाने फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूची निवड करण्यासाठी ऑनलाईन मतदान घेतले होते. या मतदानानंतर जो काही निकाल आला तो पाहून ब्राझीलचे माजी महान फुटबॉलपटू पेले यांचे चाहते चांगलेच भडकले आहेत.
आतापर्यंत फुटबॉल विश्वात पेले यांचा चांगलाच दबदबा पाहायला मिळाला. पेले यांची गुणवत्ता, त्यांची शैली साऱ्यांनाच भावणारी अशीच होती. फुटबॉलच्या मैदानातील त्यांचा खेळ डोळ्याचे पारणे फेडणारा होता. त्यांच्या चाहत्यांची संख्या आतापर्यंत कोट्यावधी आहे. त्यामुळे जेव्हा फिफाने ऑनलाईन मतदान करायचे ठरवले होते. त्यावेळी पेलेच अव्वल ठरतील, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण प्रत्यक्षात मात्र तसे घडले नाही.
फिफाने तासाभरापूर्वी ऑनलाईन मतदानाचा निकाल जाहीर केला. त्यानुसार उरुग्वेचे अलसाइड्स गिजा हे अव्वल स्थानावर आहेत. या ऑनलाईन मतदानात एकूण 5, 78, 024 जणांनी मतदान केले. त्यापैकी सर्वात जास्त मतं अलसाइड्स गिजा यांना मिळाली असल्याचे फिफाने जाहीर केलं. त्यानंतर मात्र पेले यांचे चाहते चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले.