शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंड स्पेनपुढे आव्हान निर्माण करण्यास सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 04:09 IST

कोलकातामध्ये आज (शनिवारी) इंग्लंड आणि स्पेन संघांदरम्यान फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे.

गुरप्रीतसिंग संधू लिहितात...कोलकातामध्ये आज (शनिवारी) इंग्लंड आणि स्पेन संघांदरम्यान फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. या लढतीच्या निमित्ताने भविष्यातील युवा स्टार आपली छाप सोडण्यास सज्ज आहेत. या खेळाडूंनी आपल्या वयाच्या तुलनेत अधिक परिपक्वता दाखविली आहे. मोठे क्लब आणि विदेशातील प्रशिक्षणामुळे मिळालेला अनुभव या जोरावर वयाच्या केवळ १७ व्या वर्षी त्यांच्यात विकसित झालेली क्षमता आश्चर्यचकित करणारी आहे.इंग्लंडचा संघ मजबूत भासत आहे. विशेषत: आक्रमणातील विविधतेमुळे त्यांना रोखणे कठीण आहे. माझ्या मते हा संघ स्पेनपुढे अडचण निर्माण करू शकतो. इंग्लंडचे खेळाडू वेगवान असून कुठलाही बचाव भेदण्यास सक्षम आहे. अन्य संघांच्या तुलनेत हे खेळाडू उजव्या व डाव्या बगलेचा योग्य पद्धतीने वापर करू शकतात. पण, तंत्राचा विचार केला तर माझ्या मते स्पेनचा संघ दर्जेदार आहे. ४-२-३-१ च्या पोझिशनसह ते चांगली कामगिरी करीत असून या रणनीतीमध्ये बदल करतील, असे वाटत नाही. स्पर्धेच्या वाटचालीसह त्यांच्या कामगिरीचाही आलेख उंचावत केला. स्पेन संघाला आक्रमक खेळ करणे आवडते, पण महत्त्वाच्या लढतीत सुरुवातीला बचावात्मक पवित्रा स्वीकारण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संघात अनेक वेगवान खेळाडू असून मिडफिल्डमध्ये चेंडूवर ताबा मिळवण्यात तरबेज आहेत. त्याचसोबत प्रदीर्घ काळ चेंडू नियंत्रणात राखण्यात यशस्वी ठरतात.दरम्यान, स्पेनला मात्र सावधगिरी बाळगावी लागेल कारण, थकवा हे त्यांच्यापुढे सर्वांत मोठे आव्हान राहील. उपांत्य व अंतिम लढतीदरम्यान केवळ दोन दिवसांचा कालावधी मिळाल्यामुळे त्यांना कोलकातातील वातावरणासोबत झटपट जुळवून घ्यावे लागेल. भारत विशाल देश असून प्रवास येथे थकविणारा असतो. त्या तुलनेत इंग्लंडसाठी कोलकाता म्हणजे गृहमैदानाप्रमाणे राहील. कारण या संघाने गोवामध्ये खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीचा अपवाद वगळता सर्व सामने कोलकातामध्येच खेळलेले आहेत. इंग्लंडचा ब्रेवस्टर व स्पेनचा रुईज धोकादायक आहेत. या दोघांच्या गोल करण्याच्या क्षमतेव्यतिरिक्त हा सांघिक गेम असल्याचे विसरता येणार नाही. हे दोन्ही खेळाडू केवळ आपली भूमिका बजावू शकतात. ( टीसीएम)

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017