शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

घरात अडगळीत पडलेल्या यलो प्लेटमधून एक तरूण करतोय देशभ्रमंती. यलो प्लेट घेवून तो शोधतोय प्रत्येक राज्यातला अस्सल पदार्थ!

By admin | Updated: June 27, 2017 18:42 IST

हिमांशू सेहगल या युवकानं घरात एक दिवस पिवळ्या रंगाची वापरात नसलेली प्लेट पाहिली, ती प्लेट घेऊन तो निघालाय एका खाद्य भ्रमंतीला .

-सारिका पूरकर-गुजराथीतो एक जनरेशन नेक्स्टचे प्रतिनिधीत्व करणारा तरुण . संगणक अभियंता. डिजिटल मार्केटिंग सल्लागार म्हणून चांगला जॉब. चांगलं लाईफस्टाईल. सर्व एकदम छान. ..पण तरीही तो अस्वस्थ होता. आपण जे करतोय ते आपल्याला करायचं नाहीये. .जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे मानवी जीवन आहे आणि ते असं फक्त नोकरी करण्यात घालवायचं नाही एवढंच त्याला ठाऊक . ही अस्वस्थता मनात बाळगल्यानेच मन नोकरीत रमत नव्हतं. काय करावं सुचत नव्हतं. आणि अचानक एक दिवस घरातील किचनमध्ये पडलेल्या यलो प्लेटनं त्याचं आयुष्य बदलून टाकलं. त्याला एक नवं स्वप्न या यलो प्लेटनं दिलं. तो अक्षरश: नव्यानं या यलो प्लेटच्या प्रेमात पडला आणि आज या यलो प्लेटशिवाय त्याचं आयुष्य तो इमॅजिनही करत नाही. तुम्ही म्हणाल काय भानगड आहे ही?

 

             तर ही गोष्ट आहे एका फूड ब्लॉगरची. दिल्लीतील हिमांशू सेहगल या युवकानं घरात एक दिवस पिवळ्या रंगाची वापरात नसलेली प्लेट पाहिली. खरं तर याच प्लेटमध्ये त्याची आई त्याला जेवण वाढत असे. एकदा त्यानं याच प्लेटवर राजमा-चावल सर्व्ह केलेला फोटो काढला आणि तो अपलोड केला होता. अनेकांनी तो लाईक केला. पण कालांतरानं ही प्लेट अडगळीत जाऊन बसली. अचानक ती त्याच्या नजरेस पडली आणि या प्लेटचा वापर काहीतरी क्रिएटिव्ह प्रकारे करण्याचा त्यानं निर्धार केला. त्यानं ताबडतोब नोकरी सोडली. ती प्लेट घेतली आणि एक कॅमेरा आणि थेट निघाला एका अनोख्या खाद्य भ्रमंतीला.या खाद्यभ्रमंतीचा त्याचा उद्देश आहे भारतातील विविध प्रांतातील अत्यंत रुचकर, काही खास पण वेगळ्या चवीचे पदार्थ टेस्ट करण्याचा आणि इन्स्ट्राग्रामच्या मदतीनं अस्सल खवय्यांपर्यंत पोहोचविण्याचा. भारतीय खाद्यसंस्कृतीत हजारो पदार्थांची विविधता आढळते. प्रत्येक राज्य, प्रत्येक गाव येथे अनेक पदार्थ बनवले जातात. जगभरात ही भारतीय खाद्यसंस्कृती आणखी वेगळ्या प्रकारे कशी पोहोचवता येईल हा देखील विचार या फूडब्लॉगमागे आहे. ‘माय यलो प्लेट’ हे इन्स्ट्राग्रामवर त्यानं सुरु केलेले खाते आहे. या खात्यावर, तो जेथे जेथे भटकतो, त्या त्या भागातील अत्यंत लोकप्रिय, काही पारंपरिक पदार्थ तो त्याच्या यलो प्लेटमध्ये खातो, तेथील निसर्ग आणि त्याची यलो प्लेट यांचा सुंदर मेळ साधत सुंदरसा फोटो काढतो आणि मग या खात्यावर तो पोस्ट करतो. पोस्ट टाकताना मग या भागातील प्रवासाचे, तेथील लोकांशी साधलेल्या संवादाचे अनेक किस्से तो सांगतो. त्याचं म्हणणंच आहे की ‘या प्रवासात मला लोकांना भेटायचं आहे, त्यांच्याशी कनेक्ट व्हायचंय, त्यांचं जगणं अनुभवायचं आहे, या सुंदर आणि चवदार पदार्थांची ही निर्मिती पाहायची आहे. नवे चेहरे, नवे प्रदेश हे सारं पाहायचंय मला या यलो प्लेटच्या माध्यमातून. मुख्य म्हणजे जग जे करते, ते मी करणार नाही, जगाच्या वाटेवर न चालता मला माझी स्वत:ची वाट निर्माण करायची आहे.’

    हिमांशूला संपूर्ण भारत पालथा घालायचा आहे, जमलं तर त्याच्या यलो प्लेटला परदेश वारीसुद्धा घडवायची आहे. भारतातील २९ राज्यांमध्ये जाऊन २९ असे पदार्थ की जे भारताच्या लोकसंस्कृतीचे, तेथील प्रादेशिकतेची, अस्सल भारतीय चवीची ओळख आहेत अशा पदार्थांना हूडकून काढायचंय. या अनोख्या प्रवासात त्यानं आत्तापर्यंत बंगळुुरु, आसाम, दिल्ली, मुंबई, हिमाचल प्रदेश, राजस्थान, जयपूर, आग्रा, पुष्कर, ऋषीकेश येथे त्याच्या यलो प्लेटमधून तेथील पदार्थ चाखले आहेत. हे पदार्थ त्या शहरात कुठे मिळतात, हे देखील त्यानं इन्स्ट्राग्रामवर टाकले आहे. वरवर सोप्या दिसणाऱ्या या प्रवासातही अडथळे येतात त्याला. एक तर प्रवास खर्चिक असतो. त्याबद्दल त्याची मात्र कुरकूर नसते.त्यासाठी त्याने मदतीचे आवाहन करीत १.६८ लाख रुपये जमवले आहेत. कमीत कमी ५ लाख रुपये जमवायचे आहेत त्याला. दुसरं म्हणजे त्याच्या यलो प्लेटमध्ये त्या प्रदेशातील पदार्थ आकर्षकपद्धतीनं सजवून ती प्लेट स्वत:च्या डाव्या हातात ठेवतो आणि सभोवतालचा परिसर, निसर्गसौंदर्य, माणसं, हातातील प्लेट, त्यातील पदार्थ याची योग्य सांगड घालत, एक छानसा अ‍ॅँगल बघून एका हातान< तो स्वत:च फोटो काढतो. असे २५१ फोटो त्याने आत्तापर्यंत अपलोड केलेय. २०,००० फॉलोअर्स त्याला मिळालेय.

  पण घरचे मात्र हिमांशूच्या या यलो प्लेट प्रेमाला वैतागले आहेत. कोण लग्न करणार याच्याशी म्हणून त्यांना प्रश्न पडलाय. अर्थात हिमांशूने ते मनाला लावून घेतलेलं नाही.