शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

वजन कमी करायचंय? या बिया खा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 16:50 IST

वजन कमी करायचं म्हणून फॅन्सी डाएट करण्यापेक्षा आहारात या बियांचा समावेश करा, जास्त तंदुरुस्त व्हाल!

ठळक मुद्देविविध बियांच्या चटण्या हा एक सोपा मार्ग. तोंडीलावणंही, पौष्टिक आहारही!

वजन वाढणं आणि ते कमी करण्यासाठी एकसेएक डाएट करणं हा जगाच्या अंतार्पयत चालणारा विषय आहे. नुस्ती हवा खाल्ली तरी वजन वाढेल असं म्हणणारे तर कितीतरीजण आपल्या अवतीभोवती असतात. सतत वजनकाटा त्यांच्या डोक्यात फिरतो. त्यात आता क्रेझी डाएट्स येतात. सुपरफूड नावानं बर्‍याच पदार्थाची चर्चा होते. आणि एवढं करुन अनेकदा वजन वाढत नाही. पण अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जर वजन कमी करायचं असेल तर काही बियांचा समावेश आपल्या आहारात करायला हवा. कारण आपल्याला फक्त वजन कमी करायचं आहे. आपलं शरीर पोखरुन काढायचं नाही की, खंगवायचं नाही. शरीराचं पोषण करत वजन कमी करणं हा उत्तम पर्याय. तर त्यासाठी या बियांची मदत होऊ शकते.मुख्य मुद्दा म्हणजे पूर्वी आपण आहारात अनेक बियांची चटणी खायचो. नुस्त्या भाजून खायचो. पण आता ते करत नाही. अळशी, तीळ, अळीव, कारळं, यांच्या चटण्या खाणंही फार पोषक ठरू शकतं. 

1) भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया भाजीत दिसल्या तरी अनेक बहाद्दर काढून टाकतात. पण या बिया फार पौष्टिक. त्यात मोठय़ा प्रमाणात झिंक असतं. आणि त्या खाल्यानं टेस्टोस्टेरॉन हे होर्मोन वाढीसही मदत होते. त्यातून तुम्हाला मसल  टोन करायचे असतील. मसल बिल्ड करायचे असतील, तुम्ही मसल ट्रेनिंग करत असाल तरी भोपळ्याच्या बिया खाणं उत्तम. 

2) सूर्यफुलाच्या बिया

या बिया लहानपणी अनेकजण सोलून खायचे, भाजून खायचे. आताशा खाणं कमी झालेलं असलं तरी त्या बिया लागतात रुचकर. त्यामुळे सूर्यफुलाच्या बिया खा, आणि मस्त एनर्जी मिळवा.

3) अळशीच्या बिया

नाव जरी अळशी असलं तरी बिया फार कामाच्या. यात भरपूर लोह, प्रोटीन, फायबर असतं. अळशीची चटणी रोज आहारात घेतली तर उत्तम. थंडीत कफ होतो त्यासाठीही अळशीच्या बिया उपयुक्त. त्यामुळे मस्त अळशीची चटणी करा आणि खा! फीट रहा.