शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

अ‍ॅल्युमिनियमच्या भांडयातलं विषारी सत्य

By admin | Updated: April 26, 2017 17:30 IST

अ‍ॅल्युमिनियममध्ये विषारी घटक असतात जे मानवाच्या आरोग्यला हानिकारक असतात हे काही आज कालचं संशोधन नसून जवळ जवळ शंभर वर्षांपूर्वी झालेल्या अभ्यासातून हे सत्य पुढे आलं आहे.

प्रत्येक बाबतीत पैशानं परवडणाऱ्या गोष्टींचा विचार करून कसं चालेल? आणि प्रश्न जेव्हा आरोग्याचा येतो तेव्हा काय परवडतं यापेक्षाही काय चांगलं याचा विचार व्हायला हवा.आता आपल्या स्वयंपाकघरातल्या अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांचंच घ्या ना. आता तुम्ही म्हणाल त्या बिचाऱ्या अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्याचा आणि आरोग्याचा कोणता आलाय संबंध? पण संबंध आहे.

 

 

 

 

अनेक संशोधनातून हे सिध्द झालं आहे की अ‍ॅल्युमिनियमची भांडी आरोग्यास हानिकारक असतात. अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक करताना भांड्यामधील अ‍ॅल्युमिनियम हे पदार्थात आणि पाण्यात मिसळतं आणि खाण्या-पिण्याद्वारे ते आपल्या पोटात जाऊन रक्तप्रवाहात मिसळतं. आणि शरीराच्या वेगवेगळ्या अवयवात ते साठून राहतं. त्याचा परिणाम अनेक लोकांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतो. कोणाला हायपर अ‍ॅसिडिटी, अल्सर, अपचन होतं तर कोणाला इसब, काळे डाग, कोंडा, अत्यंत दाह यासारख्या त्वचाविकारांना सामोरं जावं लागतं. तर कोणाला अ‍ॅस्टोपोरोसिससारखे आजार जडतात. पण सर्वांमध्ये सारखा दिसून येणारा परिणाम म्हणजे अ‍ॅल्युमिनियममुळे हाडांची वाढ खुंटते. अ‍ॅल्युमिनियममध्ये विषारी घटक असतात जे मानवाच्या आरोग्यला हानिकारक असतात हे काही आज कालचं संशोधन नसून जवळ जवळ शंभर वर्षांपूर्वी झालेल्या अभ्यासातून हे सत्य पुढे आलं आहे. आणि म्हणूनच विकसित देशांनी आपल्या स्वयंपाक घरातून अ‍ॅल्युमिनियमची भांडी काढून टाकून नॉन स्टिक कूकवेअर आणले. पण विकसनील देशात मात्र अजूनही पैशाला परवडतात म्हणून अ‍ॅल्युमिनियमची भांडी घरापासून सार्वजनिक ठिकाणापर्यंत सर्वत्र वापरली जात आहेत. आणि ज्यांना परवडतं ते मग नॉन स्टिक भांडी वापरू लागले आहेत.

 

                              पण नॉनस्टिकची भांडी वापरतानाही ती जपून वापरावी लागतात. कारण या भांड्यांना टेफलॉन कोटिंग असतं. त्याच्याखाली अ‍ॅल्युमिनियम असत. हे टेफलॉन अन्नपदार्थांचा आणि अ‍ॅल्युमिनियमच्या संपर्काला रोखतं. पण हे कोटिंग निघालं की मात्र अ‍ॅल्युमिनियमशी अन्नघटकांचा संबंध येवून ते पदार्थात मिसळू लागतं. म्हणून नॉनस्टिक भांडी वापरताना त्यांचं कोटिंग सांभाळणं गरजेचं असतं. ही भांडी घासतांना टोकदार दातांच्या घासण्यांनी ,स्टीलच्या घासण्यांनी घासू नये. मऊ किंवा नॉयलॉनच्या घासण्यांनी ही भांडी घासली तर हे कोटिंग टिकू शकतं. पण नॉंनस्टिक भांड्यातील टेफलॉन या घटकाबद्दलही एक संशोधन झालं असून ते संशोधन सांगतं की हे टेफलॉन जर कायम आपल्या वापरात असेल तर रोगप्रतिकारशक्ती कमी होवून किडनीचे आजार होवू शकतात.शिवाय कर्करोगाचीही शक्यता असते. नॉनस्टिक भांडे जर मोठ्या आचेवर तापवले तर हे टेफलॉन घातक ठरू शकतं. म्हणून म्हणून पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ नॉनस्टिक भांडे मोठ्या आचेवर ठेवू नये असं सांगितलं जातं. नॉनस्टिक भांडे वापरताना ते खरचटून त्यावरचं कोटिंग निघू नये म्हणून लाकडाचे किंवा प्लॅस्टिकचे चमचे वापरले जातात. पण हे चमचे सारखे स्वयंपाकासाठी वापरले आणि ते व्यवस्थित स्वच्छ केले नाहीत तर मात्र अस्वच्छतेमुळे या चमच्यांमुळेही जंतूसंसर्ग होतो.त्यामुळे अ‍ॅल्युमिनियमला उत्तम पर्याय म्हणजे लोखडी कढया आणि तवे. स्टीलची भांडी आणि चमचे. या अशा भांड्याद्वारे आपण आपल्या रोजच्या आयुष्यातून आपल्या पोटात अन्नाद्वारे जाणारा विषप्रवेश नक्कीच रोखू शकतो.