शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
4
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
5
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
6
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
7
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
8
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
9
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
10
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
11
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
12
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
13
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
14
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
16
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
17
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
18
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
19
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
20
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार

खास पध्दतीची मसालेदार चविष्ट भरलेली वांगी, न खाणारेही आवडीने खातील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 10:54 IST

वांग किंवा वांग्याची भा़जी सगळ्याच्या घरात होत असते. कोणालाही साधी सोपी तयार केलेली वाग्यांची भाजी फारशी आवडत नसते.

(Image credit-memaharashtrian)

वांगी  किंवा वांग्याची भाजी सगळ्याच्या घरात होत असते. कोणालाही साधी सोपी तयार केलेली वाग्यांची भाजी फारशी आवडत नसते. पण तेच जर  भरलेली वांगी असेल तर घरातील लोकं आवडीने ते खातात. चला तर मग जाणून घेऊया, कशी तयार कराल झटपट चविष्ट भरलेली वांगी. 

(Image credit-curryfix.com)

साहित्य: अर्धा किलो जांभळी बिनबियांची वांगी (मसाला भरतो तशी चिरून घ्या), ४ कांदे (गॅसवर डायरेक्ट भाजून घ्या), अर्धी वाटी दाण्याचं कूट, अर्धी वाटी तिळाचं कूट, ८-१० लसूण पाकळ्या, बोराएवढा गूळ, १ टेबलस्पून काळा मसाला, १ टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून तेल, थोडीशी मोहरी.

(Image credit-pintrest)

(Image credit-Femina.in)

मसाल्याची कृती:

१) भाजलेले कांदे, लसूण मिक्सरमधे फिरवून बारीक वाटून घ्या.२) नंतर त्यात दाण्याचं कूट, तिळाचं कूट, काळा मसाला, तिखट, हळद, मीठ आणि गूळ घालून मिक्सर अगदी एकदाच फिरवा.३) दाण्याचं, तिळाचं कूट जास्त बारीक करायचं नाहीये. वांग्यात भरण्याचा मसाला तयार आहे.

(Image credit -recipestrack.blogspot)

भाजीची कृती:

१) प्रथम वांग्यांमधे तयार मसाला भरून तयार ठेवा.२) एका नॉनस्टिक कढईत तेल चांगलं गरम करा. गरम झालं की त्यात मोहरी घालून तडतडू द्या.३) आता त्यात हिंग घाला. नंतर त्यात भरलेली वांगी घाला. चांगलं हलवून घ्या.४) अगदी मंद आचेवर झाकण ठेवून वांगी अगदी मऊ होईपर्यंत वांगी शिजवा. भरली वांगी तयार आहेत.

(Image credit-youtube)

एवढी भाजी ४-५ जणांना पुरते. आवडत असल्यास १ टेबलस्पून चिंचेचा कोळ घाला. गूळ नाही घातला तरी चालू शकेल. आवडत असल्यास तयार मसाल्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. बिनबियांची वांगी मिळाली नाहीत तर साधी काटेरी वांगीही चालतील.या भाजीबरोबर गरम भाकरी, ठेचा उत्तम लागेल.

सौजन्य- (sayalirajadhyaksha) 

टॅग्स :foodअन्नReceipeपाककृती