शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
3
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
6
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
7
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
8
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
9
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
10
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
11
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
12
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
13
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
14
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
15
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
16
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
17
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
18
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
19
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
20
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

‘हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 08:31 IST

जपानमध्ये याच साध्या चॉकलेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

कुरकुरीत वेफरला चॉकलेटचा थर लावून तयार केलेले किटकॅट भारतातल्या चॉकलेट, गोळ्यांच्या दुकानात एका कोपऱ्यात दिसते. काही विशेष म्हणून चॉकलेट विकत घ्यायचे असेल, तर क्वचितच आपण किटकॅट घेऊ. कारण त्याचे स्वरूपच साधेसुधे आहे. पण जपानमध्ये याच साध्या चॉकलेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

इतर देशांत किटकॅट म्हणजे मधून तोडता येईल अशाप्रकारे बनविलेले वेफर चॉकलेट, पण जपानमध्ये याची महतीच वेगळी आहे. इथे किटकॅट चक्क चारशेहून जास्त फ्लेवर्समध्ये मिळते. जपानी माणसांना किटकॅटचा जन्म जपानमध्ये न होता ब्रिटनमध्ये झाला हे सांगितले, तर पटणार नाही. इतके जपानने किटकॅटला जवळ केले आहे. एका स्ट्रॉबेरी मोसमाच्या सुरुवातीला किटकॅट उत्पादकांनी ठरवले की, वेफरच्या बाहेरच्या आवरणातल्या चॉकलेटमध्ये आपण स्ट्रॉबेरीची पूड घालुयात. जरा आंबटगोड लागणारे हे वेफर्स लोकांना आवडतात का बघूयात. कंपनीचा हा प्रयोग अपेक्षेपेक्षा फार म्हणजे फारच यशस्वी झाला आणि मग वेगवेगळ्या फ्लेवर्सचे किटकॅट बनू लागले. त्यातही इतके प्रयोग होऊ लागले की, काही किटकॅट वर्षातले काही दिवसच मिळतात, तर काही फ्लेवर्स विशिष्ट प्रांतातच मिळतात. 

उदाहरणार्थ क्युश्यू आणि ओकीनावामध्ये रताळ्यासारख्या जांभळ्या कंदापासून बनविलेले किटकॅट मिळतात, तर नागोया प्रांतात चवळीसारख्या कडधान्यापासून बनवलेली किटकॅट तिथल्या कॅफेजमध्येसुध्दा असतात. शिझोकामध्ये वसाबीचा झिणझिण्या आणणारा स्वाद असलेली किटकॅट मिळते.  बोटाच्या तीन पेरांएवढी किटकॅट सगळ्यात लोकप्रिय आहे. रोज चाळीस लाख छोट्या किटकॅट विकल्या जातात. १९३० च्या दशकात  ब्रिटनमध्ये किटकॅटचा जन्म झाला. हे चॉकलेट कामगारांना कामातून ब्रेक मिळाला की सहज खाता येईल, त्यातून त्यांना तरतरी येईल, अशा मार्केटिंग स्ट्रॅटेजीने बनवले गेले होते. म्हणूनच ‘हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट’ अशी टॅगलाईन त्याला देण्यात आली. त्याची किंमत सगळ्यांना परवडेल अशी ठेवण्यात आली, पण इतर वेळी मनाची कवाडे बंद ठेवणाऱ्या जपानी जनतेने किटकॅटला मात्र मनापासून स्वीकारले आणि या साध्या चॉकलेटला शाही दर्जा मिळाला.

मुक्त पत्रकारbhalwankarb@gmail.com

टॅग्स :foodअन्नJapanजपानIndiaभारत