शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

वाढत्या वयात मोड आलेले कडधान्य खाणं नुकसानकारक? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 10:51 IST

आरोग्यासंबंधी सतत चिंतेत राहणाऱ्या लोकांमध्ये अलिकडे मोड आलेलं कडधान्य चांगलेच लोकप्रिय होत आहेत.

आरोग्यासंबंधी सतत चिंतेत राहणाऱ्या लोकांमध्ये अलिकडे मोड आलेलं कडधान्य चांगलेच लोकप्रिय होत आहेत. लोक आजारांपासून वाचण्यासाठी आणि नेहमी फिट राहण्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून कडधान्यांना पसंती मिळत आहे. काही लोकांचं असं मत आहे की, मोड आलेले कडधान्य आरोग्यवर्धक आणि इतर पर्यायांच्या तुलनेत अधिक पौष्टिकही आहेत. असेही मानले जाते की, मोड आलेल्या कडधान्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते. 

जर तुम्ही खाण्यासाठी कडधान्य अंकुरित करत असाल तर ते केवळ तोपर्यंत अंकुरित होऊ द्या जोपर्यंत धान्य स्वत: अंकुरित होत नाहीत. जर मोड अधिक वाढू दिले तर ते धान्यातील पोषक तत्त्वांचा वापर करून पोषक तत्व कमी करतात.

मोड आलेल्या धान्याचे पोषक तत्त्व

मोड आलेल्या कडधान्यात फायबर, व्हिटॅमिन, खनिज, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्ससारखे बायोअ‍ॅक्टिव तत्व असतात आणि मोड आलेल्या कडधान्याचे सेवन करून तुम्ही हे पौष्टिक तत्व मिळवू शकता. यात कॅलरी, चरबी आणि सोडियम सुद्धा कमी असतं. 

रिसर्च काय सांगतो?

मोड आलेल्या धान्यातील कार्बोहायड्रेट शुगरमध्ये रूपांतरित होतात, तर प्रोटीन अमीनो अ‍ॅसिडमध्ये बदलतात. तसेच चरबी फॅटी अ‍ॅसिडमध्ये बदलतं. या बदलामुळे शरीरासाठी पोषक तत्त्वांना शोषूण घेणं सोपं होतं. १९४० मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, मोड आलेल्या कडधान्यात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. २००१ मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ फूड सायन्स अ‍ॅन्ड न्यूट्रिशनला आढळलं की, कोरड्या धान्याच्या तुलनेत मोड आलेल्या कडधान्यात जास्त अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन असतं. 

२००८ मध्ये टाइप २ डायबिटीसमध्ये मोड आलेले पांढरे किंवा ब्राउन राइसवर एक रिसर्च करण्यात आला. या रिसर्चमधून असं आढळलं की, मोड आलेल्या तांदळाच्या सेवनामुळे ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. 

वृद्धावस्थेत मोड आलेले धान्य खाऊ शकता का?

होय...वृद्धावस्थेतही तुम्ही मोड आलेले धान्य खाऊ शकता. मोड आलेल्या धान्याचे पोषक तत्व लक्ष घेता असं म्हणता येईल की, हे वृद्ध लोकांसाठीही फायदेशीर आहेत. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं, जे डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर असतं आणि पचनासही मदत होते. वृद्धावस्थेत अशाप्रकारच्या समस्या असणं सामान्य असतं. त्यामुळे वृद्ध लोकांसाठी मोड आलेले कडधान्य फायदेशीर ठरतात. धान्यातील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स शरीराला फ्री रॅडीकल्सपासून सुरक्षित राहण्यास मदत करू शकतात. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स