शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मिल्कशेक आणि फ्रुट सॅलाडही हरवणारा ' शाही सफरचंद हलवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 17:04 IST

चवीला उत्तम आणि शाही फील देणारा सफरचंद हलवा एकदा तरी करून बघायला हरकत नाही. 

पुणे : फळ आणल्यावर मिल्कशेक आणि फ्रुटसॅलाड सोडून इतर पदार्थ फारसे खाल्ले जात नाहीत. विशेषतः सफरचंद तर इतर कशातही वापरण्याची पद्धत नाही. गाजर, भोपळ्याचा हलवा सर्वसाधारणपणे केला जातो. मात्र सफरचंदाचा हलवा मात्र अजूनही दुर्लक्षित आहे. चवीला उत्तम आणि शाही फील देणारा सफरचंद हलवा एकदा तरी करून बघायला हरकत नाही. 

साहित्य :

किसलेले सफरचंद दोन वाटी 

मावा किंवा खवा एक  मोठा चमचा 

एक कपभर दूध 

साखर पाऊण वाटी 

बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते बारीक काप (आवडीनुसार)

व्हॅनिला इसेन्स ३ थेंब 

तूप दोन चमचे 

मीठ चिमूटभर 

टूटीफ्रूटी (सजावटीसाठी)

कृती :

  • सफरचंद किसून पाण्यात घालून ठेवावे. त्यामुळे काळे पडत नाही. (साल आवडत असल्यास तेही घेऊ शकता, त्यामुळे हलवा लालसर रंगाचा आणि पौष्टिक होतो. मात्र आवडत नसल्यास सफरचंद सोलून किसावे. 
  • नॉनस्टिक पॅनमध्ये दोन चमचे तूप घेऊन त्यात सफरचंदाचा किस टाकून परता. तळाला चिकटू देऊ नये. 
  • दोन मिनिटानंतर त्यात खवा किंवा मावा टाकून मिश्रण एकजीव होईपर्यंत परता. 
  • दोन मिनिटे परतल्यावर त्यावर दूध टाकून एकजीव करून त्यातील ओलेपणा कमी होईपर्यंत हलक्या हाताने परतत रहा. 
  • या मिश्रणात चिमूटभर मीठ घाला. मिठाने हलवा रुचकर होतो. 
  • त्यात आता पाऊण वाटी साखर घाला. या प्रमाणात हलवा मध्यम गोड होतो. मात्र खूप गोड  आवडत असल्यास साखरेचे प्रमाण वाढवावे.
  • साखर विरघळायला लागल्यावर त्यात दोन ते तीन थेंब व्हॅनिला इसेन्स आणि ड्रायफ्रूटचे काप घालून मिश्रण बारीक आचेवर परतत रहा. 
  • आणि थंड झाल्यावर वाटीत हलवा सर्व्ह करा. त्यावर आवडत असल्यास टुटीफ्रुटीने सजवून सर्व्ह करू शकता. हा हलवा फ्रीजमध्ये चार दिवस टिकतो. 
टॅग्स :PuneपुणेReceipeपाककृतीfoodअन्नfruitsफळे