शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशची शान असलेले वांग्याचे भरीत नक्की करा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 17:36 IST

गरेदार वांगे,शेंगदाण्याचा स्वाद त्याला कांद्याच्या पातीची साथ आणि त्याला कांदा लसणाची फोडणी असलेले हे भरीत किती खाऊ आणि किती नको असे होते.

पुणे : खान्देश म्हटलं की डोळ्यासमोर येत ते वांग्याचं भरीत ! गरेदार वांगे,शेंगदाण्याचा स्वाद त्याला कांद्याच्या पातीची साथ आणि त्याला कांदा लसणाची फोडणी असलेले हे भरीत किती खाऊ आणि किती नको असे होते. गरमागरम भाकरी, वांग्याचे भरीत, मिरचीचा ठेचा आणि बुक्कीने फोडलेला कांदा असा बेत म्हणजे आयुष्य सार्थकी लागल्याची भावनाचं ! तेव्हा जिभेला तृप्त करणारे हे भरीत नक्की करून बघा. 

साहित्य :जळगावी वांगी किंवा भरताची जांभळी वांगी वापरावी लसूण पात किंवा लसणाच्या दहा ते बारा मोठ्या पाकळ्या कांद्याची पात मध्यम चौकोनी चिरलेला कांदा मिरच्या आठ ते दहा शेंगदाणे पाव वाटी तेल मोहरी मीठ कोथिंबीर 

कृती :वांग्यांना तेल लावून गॅसवर भाजून घ्या. वांगं व्यवस्थित सर्व बाजूंनी काळ्या रंगाचे भाजल्यावर ते ताटात घेऊन त्यावर १५ मिनिटे कढई किंवा पातेले झाकून ठेवावे. यामुळे साल सहज निघते. वांगं गार झाल्यावर त्याची साल काढून आणि देठ काढावा. वांग्याचा गर एक पातेल्यात घेऊन त्यात थोडेसे मीठ घालून एकजीव करावा.हीच कृती खलबत्त्यात किंवा लाकडी बडगी घालून केल्यास भरीत अधिक चवदार होते.  दुसरीकडे कढईत थोड्याशा तेलात सात ते आठ मिरच्या परतवून घ्याव्यात. मिरच्या हलक्या परताव्यात, रंग बदलू नये. या मिरच्या काढून त्यात लसूण हलका परतावा. याच तेलात शेंगदाणे घालून तळून घ्यावेत. एका मिक्सरच्या भांड्यात मिरच्या, लसूण एक ते दोनवेळा फिरवून घ्यावे. अगदी बारीक करू नये. आता कढईत पुन्हा तेल कडकडीत तापवून मोहरी टाकावी. मोहरी तडतडल्यावर मिरची, लसणाचे वाटण घालावे. त्यात चिरलेला कांदा घालावा. कांदा अर्धवट परतावा, गुलाबी करू नये. यात बारीक चिरलेली कांद्याची व लसणाची पात घालावी आणि लगेचच वांगे घालावे. यात आता शेंगदाणे घालून भरीत एकसारखे करावे. या भरतात चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करा.  हे भरीत कुठलीही भाकरी किंवा पोळीसोबत भन्नाट लागते. 

टॅग्स :PuneपुणेReceipeपाककृतीJalgaonजळगाव