शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशची प्रसिद्ध शेवभाजी म्हणजे जाळ अन धूर संगटचं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 16:38 IST

शेवभाजी म्हटलं की आठवतो तो ढाबा...लालजर्द शेवभाजी आणि सोबत कडक तंदुरी रोटी म्हणजे तोंडाला पाणी सुटणारा प्रकार.

पुणे : शेवभाजी म्हटलं की आठवतो तो ढाबा...लालजर्द शेवभाजी आणि सोबत कडक तंदुरी रोटी म्हणजे तोंडाला पाणी सुटणारा प्रकार.पण ही शेवभाजी प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने केली जाते.विशेषतः पंजाबी शेवभाजी हॉटेलमध्ये मिळते. मात्र या चवीच्या पलीकडे जात महाराष्ट्रात जळगाव, नंदुरबार, धुळे अर्थात खान्देश भागात विशेष चवीची शेवभाजी केली जाते.लाल ऐवजी काळ्या रश्श्यात केली जाणारी ही भाजी म्हणजे मेजवानीची राणी आहे. तेव्हा अस्सल महाराष्ट्रीयन चवीची 'अशी शेवभाजी' नक्की करा.

मसाल्यासाठी साहित्य :दोन मध्यम कांदे 'सुक्या खोबऱ्याची वाटी एक लसूण आठ ते दहा पाकळ्या आलं मिरे, लवंग : प्रत्येकी सहा ते सात तमालपत्र दोन पानं बादलफूल एक लहान 

भाजीसाठी साहित्य :जाड शेव कोथिंबीर तेल मोहरी लाल तिखट मीठ 

 

कृती :

कांदा उभा चिरून तेलात खरपूस परतून घ्या. 

कांदा बाजूला काढून त्याच भांड्यात किसलेले खोबरे रंग काळसर भाजा. खोबरे बाजूला करून थोडयाशा तेलात सर्व खडा मसाला परतून घ्या. हा सर्व पदार्थ गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. वाटताना थोडेसे पाणी घालण्यास हरकत नाही. एका मोठ्या काढईत तेल घेऊन त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडल्यावर त्यात मसाला घालून परतून घ्या. त्यात लाल तिखट आणि हळद घाला. एक उकळी आल्यावर चवीपुरते मीठ घालावे. मीठ कमी घालावे कारण शेवेत मीठ असतेच. रस्सा पातळ करावा कारण शेव घातल्यावर घट्टपणा येतो. खाण्याची आधी रस्सा एकदा गरम करून त्यात शेव घालून सर्व्ह करा. सजावटीसाठी कोथिंबीर घाला. ही भाजी भाकरी, भात, रोटी, पोळी किंवा ब्रेडसोबत खाता येते. 

टॅग्स :PuneपुणेReceipeपाककृतीJalgaonजळगावDhuleधुळे