recipe of instant and easy butter Chakali | अशी बनेल 'बटर चकली' झटपट ; इतकी चवदार की संपून जाईल पटपट 

अशी बनेल 'बटर चकली' झटपट ; इतकी चवदार की संपून जाईल पटपट 

पुणे : चकली... फक्त दिवाळीत नाही तर इतर दिवसातही हल्ली चकली खाल्ली जाते. चकली स्टिक, भाजणीची चकली, मुगाची चकली असे अनेक प्रकार यात केले जातात. यातलाच एक प्रकार म्हणजे बटर चकली. खुसखुशीत, झटपट करता येणारी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे न बिघडणारी ही चकली नक्की करून बघा. 

साहित्य :

  • तांदूळ एक किलो 
  • उडीद डाळ पावशेर 
  • पांढरे तीळ दोन चमचे 
  • जिरे दोन चमचे 
  • दोनशे ग्रॅम बटर 
  • मीठ चवीनुसार 
  • तेल तळण्यासाठी 

कृती :

एक किलो तांदूळ धुवून पाणी निथळल्यावर कापडावर पसरवून ते वाऱ्यावर सुकू द्यावे. 

तांदूळ छान सुकल्यावर त्यात पाव किलो उडदाची डाळ थोडीशी भाजून ती तांदळासोबत एकत्र करून बारीक दळून आणावे   

पाणी कोमट करून घ्यावे, 

परातीत तांदळाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ, पांढरे तीळ, जीरे, २०० ग्रॅम बटर एकत्र करून त्यात आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून पीठ मळावे. 

लगेच चकलीच्या साच्यात घालून पाडाव्यात. त्या कडकडीत गरम तेलात माध्यम आचेवर तळून घ्याव्यात .  

चकल्या हवाबंद डब्यात पाच ते सात दिवस टिकतात. 

Web Title: recipe of instant and easy butter Chakali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.