यावर्षी रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिवस एकाच दिवशी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांना उद्या सुट्टी असणार आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनासोबतच रक्षाबंधनाचा आनंदही द्विगुणित होणार आहे. रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी बहिणी आपल्या लाडक्या भावासाठी खास पदार्थ तयार करतात. राखी बांधल्यानंतर गोड पदार्थ नक्की भरवला जातो. आता बाजारात सर्व सहज उपलब्ध असल्यामुळे फारसं अवघड नसतं. पण बाजारातील भेसळयुक्त पदार्थांपासून बचाव करण्यासाठी जर घरीच हे पदार्थ तयार केले तर तुमच्यासोबतच घरातील इतर लोकांसाठी हे अत्यंत फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया असे काही गोड पदार्थ जे तुम्ही अगदी सहज घरीच तयार करू शकता. 

बेसनाचे लाडू 

बेसनचे लाडू म्हटलं की, आपल्या सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. तूपामध्ये खमंग भाजलेलं बेसन आणि ड्रायफ्रुट्स एकत्र केलेले हे लाडू सणासाठी अत्यंत उत्तम ठरतात. तुम्ही रक्षाबंधनासाठी बेसनाचे लाडू तयार करू शकतात. 

नारळाची बर्फी किंवा खोबऱ्याची बर्फी

अनेकदा रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमा एकत्र येते किंवा मागेपुढे येते. असातच तुम्ही खोबऱ्याच्या बर्फीचा बेत आखू शकता. खोलं खोबरं किसून त्यामध्ये गूळ किंवा साखर एकत्र करून गोड गोड खोबऱ्याची बर्फी तयार केली जाते. 

खीर 

आपल्याकडे सणाच्या दिवशी गोड पदार्थ म्हणजे खीर. मग ती तांदळाची असो किंवा शेवयांची, रव्याची असो किंवा साबुदाण्याची. पण तुम्हाला हटके आणि नवी खीर ट्राय करायची असेल तर तुम्ही माखान्याची खीर ट्राय करू शकता. मखाना म्हणजे कमळाच्या बिया... हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. खीर आणि मखाना असा गोष्टी आहेत. ज्या लहान मुलांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.

आम्रखंड 

आपण अनेकदा श्रीखंड किंवा आम्रखंड म्हटलं की, बाजारातून आणतो आणि मस्त ताव मारतो. पण तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही घरीच अगदी सहज आम्रखंड तयार करू शकता. खाण्यासाठी अगदी चविष्ट लागणारं आम्रखंड लहान मुलांपासून घरातील थोरामोठ्यांनाही आवडतं. 

काजू कतली 

काजू कतली फक्त नाव ऐकल तरीही आपल्या जिभेवर तिची चव रेंगाळू लागते. आपल्यापैकी कदाचितच असं कोणी असेल ज्याला काजू कतली आवडत नसेल. सर्वांना आवडणारी ही काजू कतली तुम्ही घरीच अगदी सहज तयार करू शकता. 

घेवर

घेवर तसं पाहायला गेलं तर मूळचा राजस्थानमधील पदार्थ. परंतु याच्या हटके चवीमुळे अनेक लोकांना हा पदार्थ फार आवडतो. तूप, मैदा आणि दूधाचा वापर करून तयार करण्यात येणारा हा पदार्थ नुसता पाहिला तरीही तो खाण्याची इच्छा होते. आतापर्यंत तुम्ही फक्त बाजारात मिळणारा घेवर खाऊन पाहिला असेल, पण हा पदार्थ तुम्ही अगदी सहज घरी तयार करू शकता. 

फिरनी 

फिरनी साधारणतः ईदच्या दिवशी तयार करण्यात येते. परंतु, याची चव अशी असते की, जवळपास सर्व लोकांनाच ही हवीहवीशी वाटते. तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी घरीच फिरनी तयार करू शकता. 

English summary :
Wanna make some special sweet on the occasion of Raksha Bandhan? if yes then do watch this videos. Learn how to make Besan ladu, Kheer, Khobryachi Barfi, Amrakhand, Ghevar, Kaju Katli, and Phirni. For more articles on Raksha Bandhan do visit Lokmat.com.


Web Title: Raksha Bandhan 2019 special sweet recipe for lovely brother and sister
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.