आलु टिक्कीमध्ये घाला 'हा' सिक्रेट पदार्थ; सर्वजण बोटं चाटत राहतील...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 19:37 IST2021-06-04T19:37:10+5:302021-06-04T19:37:57+5:30
आम्ही तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहोत ज्यामध्ये एक सिक्रेट इंग्रिडिएंट आहे, तो घातल्यावर बटाट्याच्या टिक्कीला अशी चव येईल की सर्वजण तुमचे कौतूकच करतील.

आलु टिक्कीमध्ये घाला 'हा' सिक्रेट पदार्थ; सर्वजण बोटं चाटत राहतील...
चाट, चटपटीत जेवण कुणाला आवडत नाही आणि त्यात बटाट्याच्या टिक्कीचे सर्वच खव्वये असतात. वरून कुरकुरीत पण आतून लुसलुशीत चविला चटकदार असलेली आलु टिक्की तुम्ही अशीही खाऊ शकता आणि बर्गर सोबतही. आम्ही तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहोत ज्यामध्ये एक सिक्रेट इंग्रिडिएंट आहे, तो घातल्यावर बटाट्याच्या टिक्कीला अशी चव येईल की सर्वजण तुमचे कौतूकच करतील.
साहित्य
२ बटाटे, उकडलेले आणि मॅश
१ कप वाटाणे, उकडलेले
एक टीस्पून हळद
एक टीस्पून लाल तिखट
एक टीस्पून धणे पूड
एक टीस्पून जिरे पूड
थोडीशी लसूण पेस्ट
मीठ, चवीनुसार
तेल
कॉर्नफ्लार
सिक्रेट इंग्रेडिअंट- तांदुळ
कृती
बटाटे, मटार आणि मसाले एकत्र करा. मिश्रण समान भाग आणि पॅटीजमध्ये विभाजित करा.
एका पॅनमध्ये तेल गरम करा.
तांदळाची जाडसर पेस्ट तयार करा.
प्रत्येक पॅटीला कॉर्नफ्लारमध्ये बुडवा.
प्रत्येक पॅटी हळूवारपणे तळण्याचे पॅनमध्ये ठेवा आणि ते सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
तांदळाच्या पेस्टमुळे आलु टिक्कीला वेगळी टेस्ट येते. सर्वजण तुमच्या हाताच्या चवीचे कौतूक करतील.